औरंगाबाद : औरंगाबादच्या दोन तरुणांनी संशोधन करत शेतातील पिकावर कोणता रोग पडणार आहे. हे आधीच माहिती होण्यासाठी एक उपकारण तयार केले आहे. या उपकारणाला त्यांनी ‘खेती ज्योतिष’ स्टार्टअप असे नाव दिले. सौरऊर्जेवर चालणार्या या यंत्राला सीम कार्ड जोडण्यात आले आहे. यामुळे इंटरनेटच्या मदतीने शेतकर्यांना पीकांसंबधित अचूक माहिती उपलब्ध होते.
शेतकर्यांचे सर्वात जास्त नुकसान हे पिकावरील रोगामुळे होते, शिवाय बहुतांश शेतकर्यांना कोणत्या पिकावर कोणते औषध फवारणी करायचे काही पुरेसे ज्ञान नसते त्यामुळे शेतकर्यांचे पिकाचे मोठे नुकसान होते. जर पिकावर पडणारे रोग जर आधीच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकर्यांना अगोदरच कळाले तर शेतकर्यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे पितळे बंधूंनी खेती ज्योतिषचा आविष्कार केला आहे.
ग्रामीण भागात अनेकवेळा विजेची समस्या असते त्यामुळे उपकारणाला डेटा गोळा करताना कुठलेही खंड पडू नये व तंतोतंत गोळा गोळा व्हावा या मुळे हे उपकारण विजेवर न बनविता सौरऊर्जेवर बनविण्यात आला आहे. शिवाय इंटरनेटशी जोडलेले सीम कार्ड आहे. हे सीमकार्ड शेताचे तापमान, मातीचा ओलावा, वार्याची दिशा, वेग, सूर्यप्रकाश, पाऊस, धुके, दवबिंदू आदी माहिती एका ठिकाणी जमा करते. याच माहितीच्या आधारावर कोणता रोग पिकावर पडणार आहे. हे समजण्यात मदत मिळते.