शेतीत कीटकनाशक फवारणीसाठी विद्यार्थ्याने घरीच तयार केला ड्रोन

dron

र्धा : अलीकडच्या काही दिवसांमध्ये शेतीत ड्रोनचा वापर या विषयावर सातत्याने चर्चा होत आहे. मजूर टंचाई व कमी वेळेत जास्त क्षेत्रावर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर फायदेशिर असला तरी सर्वसामान्य शेतकर्‍यांना ड्रोन कसा परवडेल? हा मुख्य प्रश्‍न आहे. मात्र गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या राम सतीश कावळे या विद्यार्थ्यानं शेतीउपयोगी फवारणीसाठी घरच्या घरी ड्रोन तयार करुन दाखविला आहे. विशेष म्हणजे राम हा इंजिनिअरिंगचा नव्हे तर कला शाखेतील दुसर्‍या वर्षाचा विद्यार्थी आहे.

रामने ऑटोमोबाईल टेक्नोलॉजीचा व्यावसायिक कोर्स केला असल्याने त्याला तंत्रज्ञानाची माहिती होतीच. शिवाय त्याने इंटरनेवर ड्रोनबाबतची माहिती घेत स्वत: ड्रोन तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने ड्रोनसाठी आवश्यक असलेले सुटे भाग गोळा केले. यामुळे अत्यंत कमी किंमतीत ड्रोन तयार झाला. त्याने तयार केलेल्या ड्रोनला दहा लीटर क्षमतेची टाकी आहे. शेताच्या चारही बाजूंची कमांड दिल्यावर हा ड्रोन अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात एक एकर फवारणी करतो. हा ड्रोन तयार करण्यास जवळपास चार लाख रुपये खर्च आला.

Exit mobile version