येथे गायींच्या ढेकरवर भरावा लागतोय कर

Cow buffalo

नवी दिल्ली : भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. येथे शेती व पशूपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र एक देश असा आहे की, जेथील लोकसंख्या ५ दशलक्ष आहे आणि १० दशलक्ष दुग्धजन्य गुरे व २६ दशलक्ष मेंढ्या आहेत. म्हणजे त्या देशात लोकांपेक्षा पशूधन जास्त आहे. त्या देशाचे नाव आहे न्यूझीलंड. मात्र या देशातील शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. याचे कारणही अजबच म्हणावे लागेल. कारण न्यूझीलंडने गायींच्या ढेकरावर कर लावला आहे. त्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी, न्यूझीलंड सरकारने हवामान बदलाचा सामना करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून नवीन कृषी कर प्रस्तावित केला. न्यूझीलंडमध्ये शेण आणि इतर हरितगृह उत्सर्जनावर कर लावण्याच्या मुद्द्यावर शेतकरी देशभरात रस्त्यावर उतरले. न्यूझीलंडमध्ये मोठ्या संख्येने लोक शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. सुमारे १० दशलक्ष गोमांस आणि दुग्धजन्य गुरे आणि २६ दशलक्ष मेंढ्या आहेत.

त्याच वेळी, जर आपण न्यूझीलंडच्या लोकसंख्येबद्दल बोललो तर तेथे फक्त ५ दशलक्ष लोक आहेत. अशा परिस्थितीत एकूण हरितगृह उत्सर्जनांपैकी निम्मे उत्सर्जन शेतातून होते. विशेषतः गायींच्या ढेकरातून निघणार्‍या मिथेनचा यात मोठा वाटा आहे. यामुळे सरकारने यावर कर लावला आहे.

Exit mobile version