कृषी क्षेत्रात आर्टिफिशयल इंटेलिजेन्स (AI) च्या वापरामुळे घडणार कृषी क्रांती; जाणून घ्या सविस्तर

shetshivar 1

पुणे : शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार केला नाही तर शेतकर्‍यांना अधिक परिश्रम, आर्थिक नुकसानीसह अन्य समस्यांना तोंड द्यावे लागते, हे आता शेतकर्‍यांनाही कळाले आहे. सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्येही दररोज नवनवे प्रयोग होवू लागले आहेत. ड्रोनद्वारे फवारणी, आर्टिफिशयल इंन्टेलिजेन्स (एआय) आधारित हवामान, सिंचनासह अन्य बाबींच्या अचूक माहितीचा वापर करुन परदेशातील अनेक प्रगतीशिल शेतकरी भरघोस उत्पन्न घेवू लागले आहेत. भारतातही काही मोबाईल अ‍ॅप व अन्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तंत्रज्ञानावर आधारित सुविधा पुरविण्यात येत आहेत.

शेतकर्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज का?
अनिश्चित हवामान हे शेतकर्‍यांपुढील सर्वात मोठे आव्हान असते. तापमान, माती, आर्द्रता, जमिनीतील नत्राचे प्रमाण आणि इतर घटकांबद्दलच्या अविश्‍वसनीय माहितीमुळे शेतकरी काही प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा प्रयत्न करण्याआधीच पिकांचे नुकसान करुन घेतात. परंतु, एआयच्या आगमनाने, शेतकर्‍यांना आता वेळेपूर्वी महत्त्वपूर्ण इनपुट मिळू शकतात. ड्रोन, उपग्रह आणि इतर आधुनिक उपकरणे नियमितपणे हवामान आणि हवामानाचा मागोवा घेतात आणि शेतकर्‍यांना विश्‍वासार्ह अंदाज आणि इनपुटसह सूचित करतात.
पिकांच्या पाण्याची आवश्यकता आणि सिंचन क्षेत्राबद्दल अचूक डेटा प्राप्त होईल. यामुळे शेतकर्‍यांना संपूर्ण शेताला पाणी देण्याऐवजी फक्त ज्या पॅचला पाणी लागते तेच सिंचन करता येते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी आवश्यक माहिती मिळवू शकतात. यामुळे पीकांचे आरोग्य ओळखणे व पिकांचे रक्षण करणे शक्य होते. तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी आणि कोणतेही नुकसान कमी करण्यासाठी योग्य उपाय देखील सुचवू शकतात.

भारतातील शेतकर्‍यांच्या या समस्यांचा सुक्ष्म अभ्यास करुन इंग्लंड स्थित जगातील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक अ‍ॅग्री-फिनटेक कंपनी मॅन्टल लॅब्सने प्लॉव (Plough) हे अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. जे शेतकर्‍यांना चालू पीक हंगामासाठी सॅटेलाईट आधारित सल्ला मोफत उपलब्ध करुन देते. प्लॉव (Plough) आटिफिशियल इंन्टेलिजन्स (एआय)वर आधारीत व्यासपीठ आहे जे शेतातील विविध परिस्थितीची नोंद करते. हे अ‍ॅप हवामानाचा अंदाज, दैनंदिन पिकांचे व्यवस्थापन, नायट्रोजन हंगाम आधारित नत्राचे प्रमाण यासह सिंचन व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन, खते, बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापर व्यवस्थापनात मदत करते आणि पीक, माती आणि हवामानाच्या परिस्थितीबद्दल रिअल-टाइम अलर्ट देखील देते. हे अ‍ॅप कृषी क्षेत्रा क्रांती घडवू शकते, अशा विश्‍वास कंपनीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून मागील काही वर्षांच्या आधारित पिकाची परिस्थितीची माहिती शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होते. हे अ‍ॅप विभागानुसार शेताची कामगिरी दर्शवतो. तसेच हवामानानुसार पाण्याची गरज किती आहे, याची अचूक माहितीही शेतकर्‍याला त्याच्या स्मार्टफोनवर उपलब्ध होते. हे अ‍ॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून या अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करणार्‍या व कार्यदर्शीकामध्ये जास्तीत जास्त नोंदी करणाऱ्या शेतकर्‍यांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून ट्रॅक्टर, टू व्हिलरसह शेतीची उपकरणे बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. भविष्यात प्लॉव (Plough) अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उपकरणे खरेदीसाठी लागणारे मार्गदर्शन, पीक विमा आदि उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले.

प्ले स्टोअर वरुन अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा।
https://play.google.com/store/apps/details?id=com.mantlelabs.plough

अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ.सोमनाथ पाटणकर, मोबाईल : 9359882016 (पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग)
गजानन नागे , मोबाइल : 7972079580 (विदर्भ विभाग)
दिनेश राठोड, मोबाइल : 8329816983 (मराठवाडा विभाग)

https://www.youtube.com/watch?v=DM0–Ilf9-M

Exit mobile version