खरिपाचे उत्पादन वाढणार; वाचा काय आहे कृषी विभागाचा अंदाज

farmer kharif

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी खरिप हंगामात बंपर उत्पादन येण्याचा अंदाज सरकारने वर्तविला आहे. भाताचे उत्पादन गत पाच वर्षांच्या तुलनेत कित्येक टनने जास्त असण्याचेही त्यात म्हटले आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २१ सप्टेंबर रोजी २०२२-२३ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जारी केला, ज्यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन १४९.९२ दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, तांदूळ उत्पादन १०४.९९ दशलक्ष टन, पोषक/भरड तृणधान्यांचे उत्पादन ३६.५६ दशलक्ष टन, मका उत्पादन २३.१० दशलक्ष टन, कडधान्य उत्पादन ८.३७ दशलक्ष टन आणि तूर उत्पादन ३८.९ दशलक्ष टन इतके अपेक्षित आहे.

तेलबियांचे उत्पादन २३.५७ दशलक्ष टन, भुईमुगाचे ८.३७ दशलक्ष टन आणि सोयाबीनचे १२.८९ दशलक्ष टन इतके झाले. कापसाचे उत्पादन ३४.१९ दशलक्ष गाठी (प्रत्येकी १७० किलो), ताग आणि मेस्ता १०.०९ दशलक्ष गाठी (प्रत्येकी १८० किलो) आणि उसाचे उत्पादन ४६५.०५ दशलक्ष टन इतके होते. २०२२-२३ च्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार फक्त खरीपात देशात एकूण अन्नधान्य उत्पादन १४९.९२ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे जो मागील पाच वर्षांच्या २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा ६.९८ दशलक्ष टन अधिक आहे. या माहितीनुसार, १०४.९९ दशलक्ष टन भात उत्पादनाचा अंदाज आहे, मागील पाच वर्षांच्या (२०१६-१७ ते २०२०-२१) सरासरी खरीप तांदूळ उत्पादन १००.५९ दशलक्ष टन पेक्षा ४.४० दशलक्ष टन अधिक आहे.

Exit mobile version