कृषी मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना टोला; वाचा काय म्हणाले

abdul sattar aditya thakre

मुंबई : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच दौरा केला. या दौर्‍यादरम्यान आदित्य ठाकरेंनी कुठे गेले कृषिमंत्री असा प्रश्न विचारला होता. याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोचरी टीका करत पलटवार केला आहे.

ज्याला बाण समजते त्याला बांध समजले. त्यांनी स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही. बांध कसा ठेवू शकतात, असा प्रतिप्रश्न करत, मला वाटते, घरात चॉकलेट खाणे वेगळे, काम्प्युटरवर बसणे वेगळे आणि जमिनीवर या गार्‍यात फिरणे वेगळे आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरे हे औरंगाबादला आले. त्यांचे अडीच तासांचे नियोजन होते. त्यात २४ मिनिटे पाहणी केली. काय २४ मिनिटांत महाराष्ट्राची पाहणी करू शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे बाण कोणते आहे. काम कोणते आहे आणि बांध कुठे आहे, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

Exit mobile version