अजित पवार म्हणाले, पंचनाम्यांसाठी अधिकारी पैसे मागतात

ajit-pawar-ncp

नगर : राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक आहे. शेतकर्‍यांच्या शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. राज्य सरकारकडून मात्र नुकसान भरपाईच्या नुसत्या घोषणा केला जातात. शेतकर्‍यांच्या हातात दमडीही आलेली नाही. उलट पंचनामे करणारे अधिकारीच शेतकर्‍यांना पैसे मागतात, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. सरकार अशावेळी काय करत? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कुठलीही मदत निधी वाटप केली नाही. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या हातात अजून दमडीही आलेली नाही. राज्य सरकारकडून नुसत्या घोषणा केल्या जातायत, असा संताप त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पंचनामे करणारे अधिकारी शेतकर्‍यांना पैसे मागत असल्याच्या घटनेकडे त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. अलीकडेच नगर जिल्ह्यात पंचनामे करणार्‍या महसूलच्या पथकाने एकरी चारशे रुपये शेतकर्‍याला मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Exit mobile version