अंबाडीच्या शरबताला आले चांगले दिवस

ambadi-sharbat

कटोल : वावरात नैसर्गिकरित्या उगवणारी अंबाडी आता हळूहळू उच्चभूंच्या सरबताच्या पेल्यात पोचली आहे. महागड्या आणि रसायनमिश्रित घातक विदेशी पेयांच्या (ड्रिंक्स) शर्यतीत स्थानिक भागात नैसर्गीकरित्या तयार केले जाणाऱ्या आणि स्वस्त पारंपारिक स्वदेशी पेयांना प्रोत्साहन देण्यासाठी आज नलुबाई सलामे यांच्या हस्ते ‘गावकुस आरोग्यदायी अंबाडीसरबत केंद्र’चे उद्घाटन करण्यात आले.

उन्हाळ्यात तापमान वाढत जाते तसेतसे आपण घातक घटकद्रव्य असलेले थंडपेय पितो ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आता लाल अंबाडी शरबत पावडर शेतकऱ्यांना प्रोत्साहन करून 100% आयुर्वेदिक पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. उष्माघातापासून बचाव होते, ‘क’ जीवनसत्व असतात आंबाडी मध्ये लोह भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी, पचन व्यवस्थित होते अनेक पोषण तत्वानी परिपूर्ण. असा हा गुणकारी अंबाडी शरबताला मोठी मागणी आहे.

जिल्ह्यातील काटोल कोंढाळी मार्गावरील पंचधार (कचारी सावंगा फाटा) येथे वऱ्हाडी तडका आणि माऊली झुणका भाकर केंद्राने गावातील गावकुस नैसर्गिक शेती समूहाने उत्पादित केलेल्या निरोगी अंबाडी सरबत विक्री केंद्राला सुरुवात केली आहे. ग्रामीण स्तरावर अशा स्वास्थ्यवर्धक उत्पादनांविषयी जाणीवजागृती व्हावी, या उद्देशाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला हा सरबत केंद्राचा उपक्रम आरंभलेला आहे. अशा उपक्रमामुळे शेतकरी, शेतमाल आणि कुटिरोद्योग यांचे स्वावलंबन आणि अस्मितेला अधिक बळ मिळेल अशी आशा आहे.

यावेळी कचारी सावंगा येथील माजी सरपंच अशोकराव बाभुळकर, गावकुस नैसर्गिक शेतकरी समूहाचे शेतकरी अनंत भोयर, रिधोरा येथील शेतकरी डांगोरे, अनुप पवार, पंचधार येथील शेतकरी जयेश्वर महल्ले व झुणका भाकर केंद्राच्या संचालक नलूबाई प्रभाकर सलामे, वीरेंद्र खंडाते, पूजा प्रमोद भलावी इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पध्दतीने बहुगुणी लाल अंबाडीचे पीक घेत असल्याचे सांगून राज्य कृषीभूषण तथा धरतीमित्र शेतकरी अनंत भोयर यांनी संपूर्ण पिकावर घरगुती प्रक्रिया केलेल्या फुलांपासून इस्टंट सरबत पाउडर, चटणी, चटपटा, कैन्डी, जाम, जेली, लालचहा आदी उपउत्पादने तयार करीत असल्याचे सांगितले.

ग्रामीण स्तरावर अशा स्वास्थ्यवर्धक उत्पादनांविषयी जाणीवजागृती व्हावी, या उद्देशाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला हा सरबत केंद्राचा उपक्रम आरंभलेला आहे. अशा उपक्रमामुळे शेतकरी, शेतमाल आणि कुटिरोद्योग यांचे स्वावलंबन आणि अस्मितेला अधिक बळ मिळेल अशी आशा आहे.

– अनंत भोयर,
सेंद्रिय शेती राज्य कृषीभूषण तथा धरतीमित्र शेतकरी

Exit mobile version