अमेरिकेत शेतकर्‍यांना १ ऐवजी २ पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जातेय; कारण…

farmer

पुणे : भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होवू नये यासाठी अमेरिकेने शेतकर्‍यांना एका वर्षात दोन पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने अमेरिकन शेतकर्‍यांना एका जमिनीच्या एका तुकड्यावर दोन पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरणे राबविण्यास सुरुवात केली असून पीक विमा नियम बदलण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत.

रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरात गव्हाची टंचाई निर्माण होण्याची भीत सर्वच राष्ट्रांना सतावत आहे. यापासून धडा घेत अन्नधान्यासाठी अन्य देशांवरील अवलंबत्व कमी करण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून अमेरिकेने त्यांच्या कृषी धोरणांची नव्याने आखणी सुरु केली आहे. अमेरिकेत शेतकरी एका वर्षात एकच पिकाची लागवड करतात. मात्र एका वर्षात दोन पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले जात आहे.

Exit mobile version