इंजिनीअरिंगचा विद्यार्थी ड्रॅगन फ्रूट शेतीतून कमतोय लाखों रुपये

indian currency

मुंबई : उच्च शिक्षण घेवूनही नोकरी मिळत नाही, अशी ओरड अनेक तरुण-तरुणी करतात मात्र इंजिनीअरिंगच्या एका तरुणाने लाखों रुपये पगार असलेली कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून शेती करत त्यातून लाखों रुपयांची कमाई करत आहे. या शेतीला त्याने व्यवसायाचे स्वरुप देत आठ जिल्ह्यांमध्ये विस्तार केला आहे. अंशुल मिश्रा हे त्या तरुणाचे नाव असून अंशुलच्या या कामाचे कौतूक संपूर्ण राज्यात होत आहे.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील अंशुलने चेन्नईहून इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने नोकरीच्या मागे न धावता गावात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यास सुरुवात केली. अंशुलने इंजिनीअरिंगच्या अभ्यासादरम्यान त्याने यूट्यूबवर ड्रॅगनची लागवड करण्याच्या पद्धती आणि फायदे जाणून घेतले होते. त्यामुळे त्याने आपल्या ओसाड जमिनीवर ड्रॅगन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग केला.

ड्रॅगन फ्रुट लागवडीमध्ये एकदाच खर्च लावून हे पीक ३५ वर्षे सतत काढता येते. ड्रॅगन पिकाची आणखी एक खासियत म्हणजे वर्षातून ७ वेळा पीक घेऊन भरपूर नफा मिळवता येतो. स्वत: शेती करुन उत्पादन घेत असतांना अंशुल ओसाड जमिनीवर ड्रॅगन फळाची लागवड करून शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहे. यासोबत ड्रॅगनची रोपटी तयार करून इतर शेतकर्‍यांना विकून नफा कमावत आहेत.

Exit mobile version