जनजागृती सेंद्रिय खतांची मात्र रासायनिक खते घेण्याचे आवाहन; सरकारच्या फतव्याने शेतकरी गोंधळात

fertilizers

वरोरा (चंद्रपूर) : पिकांकरिता जैविक खताचा वापर करावा, याकरिता कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून प्रबोधन सुरू केले आहे. याबाबत जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे रासायनिक खते (chemical fertilizers) विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी गोंधळात पडले आहेत.

मागील कित्येक वर्षांपासून पिके चांगली वाढावित व उत्पन्न अधिकाधिक व्हावे याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर करीत होते. रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होतो. धान्य, भाजीपाला खाणाऱ्या व्यक्तींना विविध आजार जडत असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा याकरिता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करणे सुरू केले.

या शेतकऱ्यांची संख्या सध्या कमी असली तरी शेतकरी जैविक खताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पुढील हंगामाकरिता सध्या रासायनिक खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ती विकत घ्यावीत, अशी सक्ती कृषी विभागाकडून केली जात आहे. जैविक खताचा वापर करण्याकरिता आग्रही असताना तोच विभाग रासायनिक खते विकत घेण्याचा आग्रह करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बँकेचे कर्ज फेडणार की खते घेणार?

मागील हंगामात घेतलेले पीककर्ज मार्च महिन्याच्या अखेरीस भरणा केल्यास पुढील हंगामाकरिता बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देते. त्यामुळे कर्ज फेडावे की खते विकत घ्यावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचा

पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करावे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे. त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे  माती परीक्षण करावे. जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे. त्यानुसार विद्राव्य खताची मात्रा ठरवावी. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्याने मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार यावर अवलंबून असते. पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण मुख्यतः केशमुळाद्वारे होते. पिके निरोगी राहण्यासाठी  मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यांपैकी एखादे जरी अन्नद्रव्य कमी पडले तरी पिकांची वाढ निरोगीपणा होत नाही. 

हे पण वाचा :

Exit mobile version