भटक्या जनावरांमुळे तब्बल 3860 लोकांचा मृत्यू; वाचा काय आहे प्रकरण

deth

मुंबई : मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात भटक्या प्राण्यांमुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात २ कोटी ३ लाखांहून अधिक भटकी जनावरे आहेत. त्यामुळे गेल्या 3 वर्षात 3860 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात भटक्या प्राण्यांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2020 पर्यंत महाराष्ट्रात भटक्या जनावरांमुळे एकूण 493 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 वर्षांत एकूण 469 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भटक्या जनावरांची वाढती संख्या आता शेतकऱ्यांच्या अकाली मृत्यूचे कारण ठरत आहे. भटक्या जनावरांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी असहाय्यतेत धुके आणि थंडीची चिंता न करता रात्रंदिवस पहारा देत आहेत. त्यामुळे शेतकरी थंडीमुळे मरत आहेत. भटक्या जनावरांच्या सुटकेसाठी प्रशासन कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही.

निसर्गापासून पळून जाण्याचा कोणताही मार्ग नसला तरी भटक्या प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी प्रत्येक धोका पत्करण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. अनेक भागात चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुपालकांनी गायींना भटकंती म्हणून सोडले आहे. ज्यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात.

चरी बुजल्याने जंगली जनावरे मोकाट

जंगलाच्या सभोवती चरी खोदण्यात आल्या होत्या. त्यामुळे जंगली जनावरे शेतवडीत येण्याचे प्रमाण काहीअंशी कमी झाले होते. खोदलेल्या काही ठिकाणच्या चरी बुजल्याने जंगली जनावरांना शेतवडीत येणे सोयीचे झाले आहे. काही ठिकाणी वनखात्यातर्फे जंगलाभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले होते. अलीकडे जंगलाच्या सभोवती कुंपण करणे काही प्रमाणात कमी झाले आहे, दुसरीकडे जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जंगली जनावरांना शेतवडीत घुसणे सोयीचे झाले
आहे.

अलीकडे गव्यांची संख्या वाढल्याने ते कळपाने शेतवडीत दिवसाढवळय़ा येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱयांना पीक वाचविण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचविणे महत्त्वाचे ठरत असून त्यांचा प्रतिकार करणे कठीण झाले आहे.

पीक नुकसानभरपाई अत्यल्प

जंगली जनावरांकडून ऊस व भात पिकांच्या नुकसानीसंदर्भात यापूर्वी वनखात्याला कळविण्यात आले. त्यांनी नुकसानभरपाईचा पंचनामा केला व ती मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठविला. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांना केवळ एक, दोन, पाच हजार अशी नुकसानभरपाई मिळाली. त्यामुळे अर्ज व इतर कागदपत्रांसाठी खर्च केलेला पैसाही मिळाला नसल्याने संतप्त शेतकऱयांनी अलीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करणे टाळले आहे.

शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा इशारा दिला, मात्र भटक्या जनावरांपासून पिके वाचवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. गावांत दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू होऊनही शेतकऱ्यांनी शेतात जाणे सोडलेले नाही. पीक नष्ट झाले तर उपासमारीने मरतील असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.

– संतोष पाटील, शेतकरी.

Exit mobile version