सर्व बाजार समित्यांमधील शेतमालाचे दर एका क्लिकवर… जाणून घ्या कुठे?

bajar-bhav

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी शेती व शेतकर्‍यांविषयक अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. कृषी तंत्रज्ञानाबाबतही त्यांनी ठोस तरतूदी जाहीर केल्या. याचे स्वागत केलेच पाहिजे मात्र महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (Maharashtra State Agriculture Marketing Board) आधीच तंत्रज्ञानाची कास धरली असून त्या दृष्टीने पाऊले टाकली आहेत.

शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी त्यांना बाजारभावाची माहिती असणे आवश्यक असते. विविध बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर वेगवेगळे असल्याने जेथे जास्त दर मिळेल तेथे माल विकल्यास शेतकर्‍यांना फायदा होवू शकतो. याकरिता शेतकर्‍यांना विविध बाजार समित्यांमधील दरांची माहिती घरबसल्या उपलब्ध व्हावी याकरीता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विविध बाजार समित्यांमधील दरांची तर माहिती होणार आहेच पण बाजार समितीमधील शेतीमालाची आवक-जावक याची देखील अद्यावत माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कोणत्या बाजार समितीमध्ये अधिकचा दर आहे याचा अभ्यास करुन शेतीमालाची विक्री करणे सहज शक्य होणार आहे.

MSAMB या नावाने अ‍ॅप

पणन मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेले अ‍ॅप MSAMB हे गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विविध बाजार समित्यांमधील शेतमालाचे भाव, शेतीमालाची दैनंदिन आवक-जावक, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची माहिती, शेतीमालाचा विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती एवढेच नाही मोफत उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version