• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

३० किलो पेक्षा जास्त वजनाचे केळी घडाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वापरले हे विशिष्ट तंत्र; जाणून घ्या सविस्तर

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in पीक लागवड
August 4, 2022 | 10:54 am
banana-tree

Banana Plantation Information : केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. केळीच्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे २४.१८ टक्के उत्पादन भारतात घेतले जाते. भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. भारतातील एकूण केळी पिकाखालील २३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. राज्यात ७२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. त्यापैकी सुमारे ४५ ते ५० हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यातच आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी निर्यातक्षम केळीचे उत्पादन काढतात. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाही. अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण, कडाक्याची थंडी, तर कधी उन्हाचा तडाखा अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास करपा, मावा, बुरशीसारख्या रोगांनाही तोंड द्यावे लागते. मात्र अशा विपरित परिस्थितीत काही शेतकर्‍यांनी ३० किलो पेक्षा जास्त वजनाच्या केळी घडाचे उत्पादन घेवून लाखों रुपयांचा नफा कमविला आहे. या शेतकर्‍यांचे नियोजन कसे होते? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

आधी हे जाणून घ्या
केळीवर येणार्‍या अनेक बुरशीजन्य रोगांपैकी करपा हा एक घातक तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम करणारा रोग आहे. इंग्रजीत या रोगास सिगाटोका लिप स्फॉट या नावाने संबोधले जाते. हा रोग मायकोस्पेरीला बुरसीमुळे होतो. केळीवरील करपा हा प्रामुख्याने तीन प्रकारचा सतो. पिवळा करपा, काळा करपा आणि नारंगी करपा, पिवळा हा मायकोस्पोरील म्युसीकोला या बुरशीमुळे होतो. तर नारंगी करपा हा मायोकोस्पोरील यूम्यूसी या बुरशीमुळे होतो तिन्ही प्रकारच्या करप्यांपैकी पिवळा करपा व नारंगी करपा ह्या रोगाची प्रादुर्भाव पीक वाढीच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. करपा रोगामुळे एकुण उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होवून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी याची वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता असते.

रोगाची लक्षणे (Crop Diseases on Banana)
या रोगाची सुरुवात खालच्या जुन्या पानांवर होते. प्रादुर्भावाच्या सुरुवातीस पानावर लहान लहान लांबट गोलाकार फिक्कट पिवळसर ठिपके व मध्य भागी काळसर ठिपके दिसुन येतात. तदनंतर पानाच्या उपशिरांच्या दरम्यान त्याचा आकार वाढत जावून पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. कालांतराने हे ठिपके मोठ्या ठिपक्यांमध्ये (१ ते २ मी.मी. पासून २ ते ३ सें.मी.) रुपांतरीत होतात. पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांचा रंग तपकिरी काळपट असतो तर ठिपक्याभोवती पिवळसर रंगाची वलय दिसुन येते. करपा रोगाची ठिपके सर्वसाधारणपणे पानांच्या कडावर आणि शेंड्याकडील भागावर आढळून येतात. रोगास अनुकुल हवामान दिर्घकाळ टिकून राहिल्यास ठिपके एकमेकात मिसळून पाने टोकाकडून करपतात. जास्त प्रमाणात तिव्रता असल्यास संपूर्ण पान सुकते, एकुण कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. याचा विपरीत परिणाम केळी उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो.

भरघोस उत्पन्नासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला

प्रति घड ३० किलो पेक्षा जास्त वजनासाठी सनशाईन अ‍ॅग्री प्रा.लि. (Sunshine Agri Private Limited) च्या शास्त्रज्ञांनी प्रति १००० झाडांना खतांच्या मात्रा देण्याचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे सांगितले आहे.
लागवडीच्या वेळी किंवा १ दिवस अगोदर ५ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खते द्यावीत. लागवडीवेळी अतिरिक्त अन्नद्रव्य देण्याची आवश्यकता नसते. मात्र त्यानंतर प्रत्येकवेळी खतांची मात्र व अन्नद्रव्यांची मात्र बदलत जाते. त्याचा तक्ता खालील प्रमाणे आहे.

लागवडीच्या नंतर १० दिवसांनी
खत : २५ किलो युरिया, २५ किलो पोटॅश, २५ किलो डी.ए.पी., २५ किलो ए टू झेड,
अन्नद्रव्य : २५ किलो ए टू झेड,
लागवडीनंतरच्या २५ दिवसांनी
खत : २५ किलो युरिया, २५ किलो पोटॅश, २५ किलो डी.ए.पी., २५ किलो ए टू झेड,
अन्नद्रव्य : २५ किलो ए टू झेड,

लागवडीपासून ४० ते ९० दिवसापर्यंत दर ८ दिवसांनी
खत : १० किलो युरिया, १० किलो पोटॅश, १ किलो मॅग्नेशिअम, १ किलो कॅल्शिअम
अन्नद्रव्य : ५० दिवसांच्या मध्ये १ वेळा २५० ग्राम ट्रॉफी, २ किलो एक्सोजिन १ लिटर एज
लगवाडीपासून ९० ते १४० दिवसांनी दर ८ दिवसांनी
खत : १० किलो युरिया, १० किलो पोटॅश,
अन्नद्रव्य : १ लिटर ए टू झेड, २५० ग्राम कुसीन गोल्ड, ५०० ग्रॅम एडॅक्स कॅब
लागवडीनंतर १४० ते १९० दिवसांनी दर ८ दिवसांनी
खत : १० किलो युरिया, १० किलो पोटॅश
अन्नद्रव्य : १ वेळा २०० मिली. अ‍ॅड्रॉन, २ लि. हॅम्पर, २ किलो एक्सोजीन, १ लि. कॅल्शिअम

लागवडीनंतर १९० ते २२० दिवसांनी दर ८ दिवसांनी
खत: ७ किलो युरिया, १० किलो पोटॅश, ३ किलो सल्फर
अन्नद्रव्य : २०० पावर पॉईंट, २ किलो एक्सोजीन, ५०० ग्रॅम अ‍ॅडेक्स कॅब, ४० मिली एक्सचार्ज
लागवडीनंतर २२० ते २५० दिवसांनी दर ८ दिवसांनी
खत : ७ किलो युरिया, १० किलो पोटॅश, ३ किलो सल्फर
अन्नद्रव्य : १ वेळा १ लि. सायरस, २०० मिली. पावर पाईंट, ५०० ग्रॅम अ‍ॅडेक्स कॅब
लागवडीनंतर २५० ते ३१० दिवसांनी दर ८ दिवसांनी
खत : ५ किलो युरिया, १० किलो पोटॅश
(अत्यंत महत्त्वाचे : वरिल फवारणीमध्ये वातावरणानुसार कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा योग्य तो बदल करावा.)

भरघोस उत्पन्नासाठी असे करा फवारणीचे नियोजन
लागवडीनंतर ३-४ दिवसांनी : कुसीन गोल्ड – ३० ग्रॅम, अ‍ॅड्रोन – ३० मिली, एफीक्स – ५ मिली, किटकनाशक + बुरशीनाशक सोबत प्रति पंपाला घेऊन फवारणी करावी.
पहिल्या फवारणी नंतर ८ दिवसांनी : सायरस – ५० मिली, पॉवर पॉईंट ३० मिली, एफीक्स ५ मिली, किटकनाशक + बुरशीनाशक सोबत प्रति पंपाला घेऊन फवारणी करावी.
तिसरी फवारणी साधारणत: १५-२० दिवसांनी : अ‍ॅडेक्स कॅब- ३० ग्रॅम, सायरस – ५० मिली, एफीक्स ५ मिली, किटकनाशक + बुरशीनाशक सोबत प्रति पंपाला घेऊन फवारणी करावी.
साधारणत: २.५ ते ३ महिन्यांच्या कालावधीत पोगा भरणी हा कार्यक्रम २ ते ३ वेळा करावा.
सायरस – २५० मिली, पॉवर पॉईंट- २०० मिली, एम ४५ – २५० ग्रॅम (२०० लिटर पाणी घेवून प्रति झाडास २०० मिली पोगामध्ये टाकून पोगा भरणी करावी.)

दुसरी पोगा भरणी : कुसीन गोल्ड- २५० मिली, अ‍ॅड्रोन – २०० मिली, एम ४५ – २५० ग्रॅम (२०० लिटर पाणी घेवून प्रति झाडास २०० मिली पोगामध्ये टाकून पोगा भरणी करावी.)
तिसरी पोगा भरणी : अ‍ॅडॅक्स कॅब – २५० ग्रॅम, ऐ टू झेड – ५०० मिली, एम ४५ – २५० ग्रॅम (२०० लिटर पाणी घेवून प्रति झाडास २०० मिली पोगामध्ये टाकून पोगा भरणी करावी.)
घडावरती फवारणी : ३०-४०% घडाची निसवण झाल्यावर सायरस – ३० मिली, अ‍ॅड्रोन – २०० मिली, कॉन्फिडोर- १० मिली : १५ लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
७०-८० % घडाची निसवण झाल्यावर : पॉवर पॉईंट ३० मिली, सन गोल्ड – २० ग्रॅम, कॉन्फिडोर – १० मिली : १५ लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
(अत्यंत महत्त्वाचे : अती थंडी असल्यास ट्रॉफ २५० ग्रॅम, मायक्रोटच ड्रीप ५ लिटर व पॉवर पॉईंट २५० मिली अतिरिक्त देणे)
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४०५०१९९८८

Tags: Banana PlantationSunshine Agri
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
tomato

ऑगस्टमध्ये टोमॅटोची शेती फायदेशीर का मानली जाते; ही आहेत प्रमुख कारणे

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट