शेतात पीक कापणी करुन ठेवतांना खबरदारी घ्या, शेतकर्‍याचे १० लाखांचे नुकसान

pik kapani

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍याबाबत धक्कादायक घटना घडली आहे. शेतकर्‍याचं १० लाखांचं सोयाबीन रात्रीत मळणी करुन गायब करण्यात आलं आहे. चांदुरबाजार तालुक्यातील वडुरा येथील शेतकरी अशोकराव गुबरे यांची अज्ञात व्यक्तीने ९ एकरातील सोयाबीन काढून त्याची गंज लावली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री सोयाबीन गायब केले आणि कुटाराला आग लावून दिली.

अदांजे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांचे झाले असून या सर्व घटनेचा पंचनामा चांदूरबाजार पोलीस स्टेशन करीत असून अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदुर बाजार तालुक्यामध्ये शेतकर्‍यांचा भाडेतत्त्वावर शेती करून आपला उदरनिर्वाह चालवणे हा मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी भाडेतत्त्वावर शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचप्रमाणे तालुक्यातील वडुरा येथील शेतकरी अशोकराव गुबरे हे मौजे खराळा येथील ९ एकर शेती करतात.

यावर्षी त्यांनी त्याशेतमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती, पिकाला आपल्या मुला बाळापेक्षाही जपले कापणीला आल्यावर कापणी सुद्धा केली शेतामध्ये सायंकाळी गंजी लागून झाल्यावर उद्या काढू अशा आशेवर ते होते. दुसर्‍यादिवशी शेतामध्ये गेल्यावर पाहिलं असता सोयाबीन गायब झाल्याचं त्यांनी पाहिलं. सोयाबीनची गंज काढून नेऊन कुटाराला आग लावून दिल्याची घटना समोर आली. ही घटना मध्यरात्री झाली असावी असा अंदाज आहे.

Exit mobile version