शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या अन् व्यापार्‍यांकडून होणारी आर्थिक लूट टाळा

indian currency

पुणे : शेतकरी सुगीच्या कालावधीत शेतीमाल एकाचवेळी विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठेत शेतमालाची मोठ्याप्रमाणात आवक होते. नेमक्या याच क ालावधीत शेतमालाचे बाजारभाव मोठ्याप्रमाणात खाली आल्याने शेतकर्‍यांना योग्य बाजारभाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची काढणी हंगामानंतर काही कालावधीसाठी साठवणूक करून बाजारभावात वाढ झाल्यानंतर तो विक्रीसाठी आणावा व वाढीव बाजारभावाचा फायदा शेतकर्‍यांनाच व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते.

शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे शेतकर्‍यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून तसेच शेतक र्‍यास या क ालावधीत असलेली आर्थिक निकड भागविण्यासाठी त्यांना सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे, हा शेतमाला तारण कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतक र्‍यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंतची रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते.

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद इ. शेतमालासाठी तारण कर्ज देण्यात येते. तसेच शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यासाठी स्वनिधी उपलब्ध नसलेल्या बाजार समित्यांना रु. ५.०० लाख इतका अग्रिम निधी पणन मंडळाकडून देण्यात येतो. बाजार समित्यांनी शेतकर्‍यांना वाटप केलेल्या तारण कर्जाची समितीच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत प्रतिपूर्ती करण्यात येते. काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामांमध्ये तारणात ठेवून शेतकर्‍यांना तारण कर्जाच्या स्वरूपात सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती
१. शेतमाल तारण क र्ज योजनेअंतर्गत फ क्त उत्पादक शेतकर्‍यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापार्‍यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
२. प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहिर केलेली आधारभूत खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते.
३. तारण कर्जाची मुदत ६ महिने (१८० दिवस) असून तारण कर्जाचे व्याजाचा दर ६ % आहे.
४. बाजार समितीने तारण कर्जाची १८० दिवसांचे मुदतीत परतफेड केल्यास तारण कर्जावर ३ % प्रमाणे व्याजाची आकारणी केली जाते. उर्वरीत ३% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येते. मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत दिली जात नाही.
५. ६ महिने (१८० दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यंत ८ टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्यांकरिता १२ टक्के व्याज दर आकारणी केली जाते.
६. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते.
७. तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची आहे.

Exit mobile version