बीड : शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तीमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे.
नुकसान भरपाईची रक्कम :
सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही. याअंतर्गत शेतकर्यांना खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळते.
अपघाती मृत्यू- रु.२ लाख.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.२ लाख अपघातामुळे १ डोळा अथवा १ हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.१ लाख.
लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा किंवा ८अ.(मुळ प्रत)
मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)
प्रथम माहिती अहवाल
विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल
घटनास्थळ पंचनामा
जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र. वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)
खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेली)
आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे :
ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतक-याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबंधीत
फेरफार नोंद (गाव नमुना नं.६ ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.
शेतक-याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग).
अर्ज कोठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात.
विमा कंपनी : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
टोल फ्री नंबर-१८०० २२ ४०३०
विमा सल्लागार कंपनी (ब्रोकर) :- मे.ऑक्झिलियम इन्शुरंन्स ब्रोकींग प्रा.लि.
प्लॉट ने.६१/४, सेक्टर-२८, प्लाझा हट च्या पाठीमागे,वाशी, नवी मुंबई- ४००७०३
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७६५००९६, टोल फ्री क्रमांक – १८०० २२० ८१२