महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या सविस्तर

mahabeej

पुणे : महाबीजने बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी एका गाव शिवारात किमान २५ हेक्टरवर बियाण्यांचे उत्पादन घेतले जाणे गरजेचे आहे. तरच महाबीज बियाणे निर्मितीचा उपक्रम राबवते. असे असलेतरी प्रथम सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येते. बीजोत्पादनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना फायदाच होतो. MahaBeej

बिजोत्पादन कार्यक्रमासाठी एका गावात कमीत कमी सर्व पीक वाण मिळून २५ एकर क्षेत्र होणे आवश्यक आहे. महाबीजचे बियाणे खरेदी धोरण व इतर अटी मान्य असलेल्या बिजोत्पादकांना बिजोत्पादन कार्यक्रम घेता येणार आहे. बिजोत्पादक कार्यक्रम घेण्यासाठी तीन महिन्याचा आतील सातबारा, ८ अ चा उतारा, आधार कार्डाची झेरॉक्स, आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक पासबुक झेराशॅक्स प्रत जोडून मागणी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी बिजोत्पादन शेतकर्‍यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय तसेच जिल्हा कार्यालय महाबीज येथे अर्ज करावा लागणार आहे. शेतकर्‍यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १०० नोंदणी फी भरावी लागते.

महाबीजने ठरवून दिलेल्या प्रमाणित बियाणांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना एक रक्कम दिली जात होती. मात्र, जिल्ह्यात त्या बियाणाचे दर काय आहेत त्यावरुनच दर निश्चित केले जात होते. महाबीजने आता राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना बियाणांच्या माध्यमातून उत्पादन मिळणार आहे.

Exit mobile version