भेंडवळच्या भविष्यवाणीने शेतकरी आनंदी; जाणून घ्या काय म्हटले आहे

Bhendwal Bhavishyavani

बुलढाणा : सुमारे ३५० वर्षांची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकर्‍यांचे लक्ष असते. कारण या भविष्यवाणीन पाऊस, पीकं, पेरणीचा अंदाज वर्तविण्यात येत असतो. बहुतांश शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार शेतीची तयारी करतात. यंदा भेंडवडच्या घट मांडणीचे भाकित बुधवारी जाहीर झाले.

भेंडवड घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. ही भविष्यवाणी ऐकून शेतकरी जाम खूश झाला आहे. भविष्यवाणीनुसार, यंदा जून-जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईल विशेष म्हणजे अवकाळी पाऊस ही राहणार आहे. तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे असं वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत केले आहे.

त्याचसोबत मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे. तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील. भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील. साडी म्हणजे तांदळाचे साधारण चांगले असेल. कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version