शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! एमएसपी संदर्भात २२ ऑगस्टला होणार मोठा निर्णय?

msp

पुणे : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हा शेतकर्‍यांसाठी नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे. २२ ऑगस्ट रोजी पिकांच्या एमएसपी एक मोठी बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत ही शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी मानली जात आहे, कारण या बैठकीत कोणताही निर्णय झाला किंवा कोणतीही चर्चा झाली, त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार आहे.

एमएसपी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या या पहिल्या बैठकीचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत समितीचे सर्व सदस्य भविष्यातील रणनीतींवर चर्चा करतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने १८ जुलै रोजी एमएसपीशी संबंधित ही समिती स्थापन केली होती. केंद्र सरकारने वादात असलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर ८ महिन्यांनी ही समिती स्थापन करण्यात आली. एमएसपीची अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे हा या समितीचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत देशातील तमाम शेतकर्‍यांच्या नजरा एमएसपीवर गठित समितीच्या या पहिल्या बैठकीकडे लागल्या आहेत.

Exit mobile version