‘या’ एका कारणामुळे हळदीच्या दरात मोठी घसरण

big-drop-in-the-price-of-turmeric-for-one-reason

सांगली : हळदीवर पाच टक्के ‘जीएसटी’ लागू केल्यानंतर सांगली बाजारात हळदीच्या दरात क्विंटलमागे हजार ते अठराशे रुपयांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये सरासरी ९ हजार ९५० रुपये असलेला दर ८ हजार १५० रुपयांपर्यंत घसरला आहे.

गेल्या आठवड्या महाराष्ट्र अग्रिम अभिनिर्णय प्राधिकरणाने हळदीवर ५ टक्के ‘जीएसटी’ लागू होत असल्याचा निर्णय जाहीर केल्याने याचा थेट परिणाम हळद सौद्यावर दिसून येत आहे. खरेदीदारांनी हळदीसाठी बोलीच कमी लावली. सोमवारी सांगलीच्या बाजारात २२३ क्विंटल हळदीची आवक झाली, तर १ हजार ५६२ क्विंटल हळदीची विक्री झाली. सौद्यामध्ये किमान दर ५ हजार तर किमान दर ११ हजार ३०० रुपये मिळाला. दराची सरासरी ८ हजार १५० रुपयांपर्यंत उतरली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा विरोध

महाराष्ट्र जीएसटीच्या अग्रिम अभिनिर्णय प्राधिकरणाने हळद ही शेतमालात समाविष्ट होणार नाही, असा निर्णय देणे हास्यास्पद आहे. तो राज्यातील हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍ऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरकडून या निर्णयास विरोध केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/12/2021
रिसोडक्विंटल1650750580507775
मुंबईलोकलक्विंटल4490001500012000
लोहाराजापुरीक्विंटल14640174906651
29/12/2021
भोकरक्विंटल1610161016101
हिंगोलीक्विंटल800725083907820
मुंबईलोकलक्विंटल4390001500012000
बसमतलोकलक्विंटल2202650784857682
लोहाराजापुरीक्विंटल19600077007175
28/12/2021
बार्शीक्विंटल8450060005000
मुंबईलोकलक्विंटल2090001500012000
बसमतलोकलक्विंटल1878700094057997
27/12/2021
हिंगोलीक्विंटल860710081507625
मुंबईलोकलक्विंटल16190001500012000
बसमतलोकलक्विंटल2460712586117809
जावळा-बाजारलोकलक्विंटल120750080007750
लोहाराजापुरीक्विंटल6530162015701
Exit mobile version