शेतकऱ्यांसमोर नवीन संकट : द्राक्षांच्या घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव

black-fungus-on-grapes

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचं दिसत असताना द्राक्षांच्या घडांवर आलेल्या बुरशीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. तसेच सद्या पडणारं धुकं, वातावरणातला गारवा आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांच्या बागांवरती परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत कोणती उपाय योजना करावी या चिंतेत शेतकरी आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून मातीमोल बाजार भावाने द्राक्षांची विक्री करण्याची वेळ निफाड तालुक्यासह इतर गावातील द्राक्ष उत्पादकांवर आली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने द्राक्षबागांवर फळधारणा चांगली झाली असताना अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यातून झुंज देत द्राक्ष बाग वाचवल्या, तर यंदाच्या थंडीच्या हंगामात किमान तापमानाचा पारा हा निफाड तालुक्यात गेल्या 25 दिवसांपासून चार ते सहा अंश सेल्सियस दरम्यान सातत्याने टिकून राहिला आहे.

त्यामुळे फुगवनीला आलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने द्राक्ष बागेला ड्रीपद्वारे पाणी देणे बागेत शेकोट्या पेटवून धूर करत ऊब निर्माण करत द्राक्ष बाग वाचवल्या. मात्र आता द्राक्ष घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या बाजार भावावर परिणाम होणार असल्याने झालेला मोठा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती निर्माण झाल्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभा राहील आहे.

या बुरशीवर काय उपाययोजना करावी ?

कोरोना काळात शेतकऱ्यांना अगदी कवडीमोलात द्राक्षाची विक्री करण्याची वेळ आली होती. यंदा पाऊस चांगला झाला होता त्यामुळे चांगली फळधारणा झाली होती मात्र अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे नुकसान झाले आहे. त्यात वाढती थंडी, धुके, गारवा वाढला असता शेतकऱ्यांनी तापमान ४ ते ६ अंश सेल्सियस दरम्यान टिकून राहावा यासाठी द्राक्ष बागेला ड्रीपद्वारे पाणी देऊन बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. आता द्राक्ष घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या बाजार भावावर परिणाम होणार असल्याने झालेला मोठा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती निर्माण झाल्यामुळे घेतलेले कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर उभा राहील आहे. पुन्हा द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version