बोगस बियाने विकून शेतकऱ्यांची फसवणूक; या जिल्ह्यात सापडला शेकडो क्विंटल बोगस माल

Seeds

नांदेड : नांदेड शहरात एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती मिलाल्यानंतर कृषी विभागाने कंपनीवर छापा टाकला. यावेळी कंपनीत अनेक प्रकारचे बोगस बियाणे तयार करत असल्याचे आढळून आले आहे.

बोगस बियाणांचे उत्पादन करून त्याची विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. दरम्यान, छाप्यात कृषी विभागाने शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे. नांदेड शहरातील अर्धापूर रोड वरील एका गोदामात मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणांचे उत्पादन करत होती. कृषी विभागाने छापा टाकून या कंपनीचा माल ताब्यात घेतला आहे. कंपनीत सोयाबीन, उडीद , हरभरा हा बियाणे तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड शहरात एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर छापा टाकला. यावेळी  कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभऱ्याच्या बोगस बियाणांची पॅकिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामातील सर्व बियाणे जप्त करण्यात आले.  

बोगस बियाणे जप्त

छापा टाकल्यानंतर गोदामात 100 क्विंटल सोयाबीन, 20 क्विंटल हरभरा , 100 क्विंटल उडीद, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन जप्त केले आहे. यावेळी कंपनीत 20 कामगार काम करत असल्याचे  आढळून आले होते. त्यामुळे या कारमगारांची देखील चौकशी होणार आहे. कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे.

मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री

छापा टाकण्यात आलेली ही कंपनी मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री करत होती. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड , बँग वरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत, दरम्यान, बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष गव्हाणे यांनी केलीय.

Exit mobile version