Clove Farming : लवंगची शेती कशी करतात, माहित आहे का?

clove-farming

Clove Farming : भारतात मसाल्यांच्या स्वरुपात लवंगचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आयुर्वेदातही लवंगला खूप महत्व आहे. अनेकांना लवंग चघळण्याची सवय असते. थंडी, ताप, सर्दी झाल्यास लवंगचा काढा आरोग्यासाठी फायदेशिर मानला जातो. भारतात प्रामुख्याने हे पीक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे. कोकण कृषि विद्यापीठाने विद्यापिठांतर्गत असणार्‍या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते. लवंग ही अशी वनस्पती आहे की एकदा लागवड केल्यावर ती सुमारे १०० ते १५० वर्षे उत्पादन देत राहते, परंतु १६ वर्षे वयापर्यंत उत्तम उत्पादन देते.

लवंग ही एक सदाहरित वनस्पती आहे, जी एकदा लावली तर अनेक वर्षे उत्पन्न मिळते. त्याच्या वाढीसाठी त्याला उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे. बारीक चिकणमाती माती सर्वात योग्य मानली जाते. लवंगाची लागवड करण्यापूर्वी लवंगाच्या बियांपासून झाडे तयार केली जातात. ज्यासाठी बीजप्रक्रिया करावी, रोपवाटिकेत बियाणे लागवड करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात चांगले मुरवावे, त्यानंतर त्याचे बियाणे रोपवाटिकेत मिश्रणाने तयार केलेल्या जमिनीत १० सेमी अंतर ठेवून लागवड करावी. लवंगाचे रोप तयार होण्यासाठी सुमारे २ वर्षे लागतात, लवंगाची रोपे लावणीनंतर ४ ते ५ वर्षांनी उत्पन्न मिळू लागतात, ज्यामध्ये झाडांवरील फळे गुदमरतात, ज्यांचा रंग लालसर गुलाबी असतो. ते फुलांच्या आधी तोडले जाते, त्याचे फळ जास्तीत जास्त २ सेमी लांबीचे असते, जे कोरडे झाल्यानंतर वापरले जाते.

लवंग लागवडीसाठी योग्य हवामान व जमीन
लवंग हे उष्ण कटिबंधातील झाड असून त्यास उष्ण दमट हवामान लागते. समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते. २० ते ३० अंश सें.ग्रे. तपमान १५०० ते २५०० मिमि पाऊस आणि ६० ते ९५ टक्के आर्द्रता या पिकास चांगली मानवते. प्रखरसूर्याच्या उष्णतेमुळे पाने व खोडावर करपण्याची क्रिया होऊन झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून या पिकास सावलीची आवश्यकता असते. लवंगाचे पीक बहूतेक सर्व प्रकारच्या जमिनीत येत असले तरी अधिक खोलीच्या उत्तम निचर्‍याच्या आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक खोलीच्या उत्तम निचर्‍याच्या आणि सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे अशा जमिनी अधिक मानवतात. लवंगाची लागवड कोणत्याही हंगामात केली तरी चालते. जोरदार पाऊस संपल्यानंतर लागवड करण्याचे फायद्याचे ठरते. लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप वापरावे. अगोदरच भरुन ठेवलेल्या खडडयाच्या मध्यभागी रोपाच्या पिशवीच्या आकाराचा खडडा उकरावा. रोप असलेल्या प्लास्टीक पिशवी, मातीत हुंडी फूटणार नाही अशा पध्दतीने काढून तयार केलेल्या खडडयात रोप लावून भोवतालची माती दाबून घ्यावी.

लवंग लागवडीसाठी खतांचे नियोजन
लवंगाच्या झाडास पहिल्या वर्षी १० किलो शेणखत/कम्पोस्ट २० ग्रॅम नत्र (४० ग्रॅम युरीया) १८ ग्रॅम स्फूरद (११० ग्रॅम सुपर फॉस्फेट) ५० ग्रॅम् पालाश (१०० ग्रॅम् म्युरेट ऑफ पोटॅश ) द्याव. हि खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी. व १५ वर्षानंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत/कंपोस्ट ३०० ग्रॅम नत्र (६०० ग्रॅम युरीया), २५० ग्रॅम स्फूरद (१५०० किलो सुपर फॉस्फेट) ७५० ग्रॅम पालाश (१५०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. ही खते दोन हप्त्यात द्यावी. लागवड केल्यानंतर तिसर्‍या महिन्यात खताचा पहिला हप्ता व दुसरा त्यानंतर सहा महिन्यांनी द्यावा. त्यापुढील वर्षापासून पहिला हप्ता पावसाळयाच्या सुरुवातीस व दुसरा पावसाळयाच्या शेवटी द्यावा.

लवंगच्या एका झाडापासून सुमारे तीन हजारांचे उत्पादन
लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्यास लागवड केल्यानंतर ४ ते ५ वर्षात लवंगाच्या झाडास फूले येऊ लागतात. फूले दोन हंगामात येतात. फेब्रूवारी मार्च च्या दरम्यान पहिले व प्रमुख उत्पन्न मिळते. तर सप्टेबर ऑक्टोबर महिन्यात दुसरे व अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते. नवीन पालवीवर लवंगाच्या कळया येतात. कळीचा अंकूर दिसायला लागल्यापासून ५ ते ६ महिन्यात कळी काढण्यासाठी तयार होते. गुच्छातील सर्व कळया एकाच वेळी काढण्यासाठी तयार होत नाही. कळयांचा घुमट पुर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारिंगी रंग प्राप्त होतो. अशाच कळयाची काढणी करावी आणि त्या उन्हात वाळवाव्यात. साधारणपणे ४ ते ५ दिवसात कळया वाळतात. लवंगाच्या १५ ते २० वर्षाच्या झाडापासून २ ते ३ किलो वाळलेल्या लवंगा मिळतात. लवंगच्या एका रोपातून एका वेळी सुमारे ३ किलो उत्पादन मिळू शकते. लवंगचा बाजारभाव ७०० ते १००० रुपये प्रति किलोपर्यंत मिळतो. त्यानुसार एका झाडाला एकावेळी अडीच ते तीन हजार रुपये मिळू शकतात.

Exit mobile version