जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई

pm-kisan-yojana-marathi

जळगाव : जिल्ह्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई  51421 शेतकऱ्यांना रक्कम रू.44,25,56,218 रक्कम जमा झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके (कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंडा मुळे, तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणे बाबत मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील एकूण पात्र विमाधारक  51421 शेतकऱ्यांनी रक्कम रू.44,25,56,218 जमा होत असल्याची माहिती संबंधित विमा कंपनीमार्फत देण्यात आलेली आहे. सदरील नुकसान भरपाईची रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान परिस्थिती या दोन प्रकारे मंजुर करुन देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना तालुकानिहाय पुढील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

जळगाव 351 शेतकरी रक्कम रू.4023717/-
अमळनेर 63 शेतकरी रक्कम रू.638825/-
भडगाव 83 शेतकरी रक्कम रू.453333/-
पाचोरा 688 शेतकरी रक्कम रू.8074965/-
चाळीसगाव 437 शेतकरी रक्कम रू.5275023
पारोळा 3265 शेतकरी रक्कम रू.32262822/-
एरंडोल 440 शेतकरी रक्कम रू.4912842/-
धरणगाव 1614 शेतकरी रक्कम रू.9675538/-
भुसावळ 32 शेतकरी रक्कम रू.253566/-
बोदवड 56 शेतकरी रक्कम रू.446813/-
चोपडा 1556 शेतकरी रक्कम रू. 23107920/-
जामनेर 5002 शेतकरी रक्कम रू.75654551/-
मुक्ताईनगर 284 शेतकरी रक्कम रू.1609425/-
रावेर 94 शेतकरी रक्कम रू.667397/-
यावल 89 शेतकरी रक्कम रू. 518250/-

प्रतिकूल हवामान परिस्थितीची नुकसान भरपाई रक्कम

अमळनेर 36761 शेतकरी रक्कम रू.27,26,87,331/-
पारोळा 117 शेतकरी रक्कम रू.223431/-
चोपडा 489 शेतकरी रक्कम रू.2070468/-
असे एकूण प्रतिकूल हवामान परिस्थितीचे मंजूर झालेले आहेत.

Exit mobile version