रब्बी कांद्याचे बंपर उत्पादन घेण्यासाठी अशा पध्दतीने करा कीड व रोगांचा बंदोबस्त

onion

नाशिक : कांद्याचे उत्पादन घेतांना कीड रोगांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान असते. योग्य वेळी त्यांचे नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होते. या कीडी व रोगांचा बंदोबस्त कसा करावा? यासाठी तज्ञांनी कोणत्या गोष्टींची शिफारस केली आहे, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

किडींचा बंदोबस्त : फुलकिड्याची बारीक पिल्ले पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने खरवडल्यासारखी दिसतात. त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १५ मि.ली. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ६ मि.ली. या कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करताना चिकटद्रव्याचा (०.१ टक्के) वापर जरूर करावा. (कीटकनाशकाचे प्रमाण १० लीटर पाण्यासाठी दिले आहे.)

मर : मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियांना थायरम/कॅप्टन २ ते ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे. किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रति किलो ४ ग्रॅम या प्रमाणात बियांना चोळावे. रोपे गादीवाफ्यावर तयार करावीत म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होतो.

करपा : नत्रयुक्‍त खतांचा वापर कमी करून पालाशयुक्‍त खतांचा वापर वाढवावा. पेरणीपूर्वी बियाण्यास डायथायोकार्बीमेट ३ ग्रॅम चोळावे. पिकांची फेरपालट करावी. कार्बोसल्फान १ मि.ली. प्रति लीटर + क्लोरीथॅलेनिल २.५ ग्रॅम प्रति लीटर किंवा प्रोफेनोफॉस १ मि.ली. प्रति लीटर + कॉपर ऑक्सीक्लोराईड २ ग्रॅम प्रति लीटर किंवा फिप्रोनिल १.५ मि.ली. प्रति लीटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून १२ ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. सोबत चिकटद्रव्ये १ मि.ली. प्रति लीटर पाण्यात वापर करावा.

काजळी : साठवणुकीपूर्वी साठवणगृह स्वच्छ करून त्यावर ५ टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी. कांदा साठवणुकीपूर्वी सुकवून घ्यावा.
साठवणुकीपूर्वी कांदे १ टक्के कार्बेन्डाझिम द्रावणाने फवारावे आणि वाळल्यानंतर साठवणगृहात ठेवावे.

मुळकुज : ट्रायकोडर्मा ४ किलो प्रति एकर वापरावे.

Exit mobile version