ऐकावे ते नवलच… चक्क गायीचे डोहाळे जेवण

cow-dohale-jevan

सांगली : मातृत्व ही महिलांच्या जिवनातील सुंदर अनुभव असतो.  कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करीत असतात. मात्र सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गायीचेही डोहाळ जेवण करीत, गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केला आहे. सांगली जिल्हयातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथील हरुगडे कुटुंबियांनी गायीचे डोहाळे जेवण पुरवण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

यासाठी अनेक महिलांनी गर्दी केली होती. त्यासोबत अनेक वृद्ध लोक देखील होते. अगदी महिलांचा जसा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तसाच कार्यक्रम या देशी गाईची ही केला होता. गाईचे डोहाळे जेवण पुरवण्याच्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी गाईची पूजा केली आणि तिला फुलांनी देखील सजवले गेले होते. महिलांनी त्या गाईची पुजासुद्धा केली होती. त्यासोबत भजन कीर्तन असे, अनेक कार्यक्रम होते.

हरुगडे यांच्या आजीची इच्छा होती की, घरात एक देशी गाय असावीच त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून ती गाई आणली. त्यांनी त्या गाईवर जीवापाड प्रेम केले. संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते असे, हरुगडे कुटुंबीयांनी सांगितले. डोहाळे जेवणासाठी सर्व गाव गोळा झाले होते. सर्व गावकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दुपारपर्यंत सर्व कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जेवणाची पंगत रंगली. त्यांमध्ये देखील गावातील सर्व लोक सहभागी झाले होते.

Exit mobile version