गायीचे दूध रोखू शकते कोरोनाचा संसर्ग; वाचा काय रिसर्चमधून झालेला खुलासा

cow-milk-for-corona

नवी दिल्ली : सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी चौथ्या लाटेची भीती अजूनही कायम आहे. देशासह संपूर्ण जगभरात कोरोना दोन वर्षांपासून ठाण मांडून आहे. एकट्या भारतात कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला सर्वच डॉक्टरांकडून देण्यात येत होता व आताही देण्यात येत आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासंबंधीच्या एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, ज्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्यदायी आहारात दूध नेहमीच महत्त्वाचा भाग राहिला आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, गायीचे दूध कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे.

गायीच्या दुधात व्हायरस प्रतिबंधक गुणधर्म असलेले प्रोटीन असते. हे प्रोटीन एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखू शकते. हा रिसर्च ’जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहेत. संशोधकांना त्यांच्या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की गायीच्या दुधात बोवाइन लॅक्टोफेरिन प्रोटीन आढळते, जे अनेक सूक्ष्मजंतू, विषाणू आणि इतर गोष्टींशी लढण्यास सक्षम आहे.

चाचणी दरम्यान, असे आढळून आले की हे प्रोटीन कोविड१९ विषाणूचा लक्ष्य पेशींमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करते. तसेच पेशींना विषाणूविरूद्ध लढण्यास मदत करते. मिशिगन विद्यापीठातील अंतर्गत औषध विभागाचे मुख्य अन्वेषक जोनाथन सेक्स्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी क्‍लिनिकल चाचण्यांदरम्यान बोवाइन लॅक्टोफेरिनने अँटीव्हायरल अ‍ॅक्टीव्हीटी दाखवली आहे.

Exit mobile version