कोथिंबीरच्या बंपर उत्पादनासाठी अशा पध्दतीने करा लागवड

Coriander-farming

कोथिंबीरची शेती

नागपूर : कोंथिंबीरीला वर्षभर मागणी असते. उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. यामुळे कोंथिंबीरीच्या लागवडीला चांगला काळ मानला जातो. उन्हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत आणि बाफसा आल्यावर बियाणे पेरावे. कोथिंबिरीच्या लागवडीसाठी हेक्टरी ६०-७० किलो बियाणे लागते.

कोंथिबिरीच्या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन चांगले भुसभुशीत करुन ३ % २ मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत. प्रत्येक वाफ्यात ८-१० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळून घ्यावे. वाफे सपाट करुन वी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे. बी खत-मातीने झाकून हलके पाणी द्यावे. तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यास सपाट वाफ्यांमध्ये १५ ते २० सें.मी. अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पाडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्यावे.

आंध्र प्रदेशातील लाम (गुंटूर) येथील संशोधन केंद्र व तामिळनाडू विद्यापीठ येथील संशोधनातून कोथिंबीरीच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत. यापैकी महत्वाच्या जातींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१) लाम.सी.एस.-२ : ही जात मध्यम उंचीची, भरपूर फांद्या असळेली आणि झुडपासारखी वाढणारी आहे.
२) लाम.सी.एस.-४ : ही जात उंच वाढणारी, भरपूर फांद्या आणि पाने असलेली आणि झुडूपबजा वाढणारी आहे. या जातीची मुख्य काडी रंगीत असते. ही जात रोग आणि किडींना प्रतिकारक आहे.
३) लाम.सी.एस.-६ : ही जात झुडूपबजा वाढणारी, भरपूर फांद्या असलेली आणि मध्यम उंचीची आहे. या जातीची मुख्य फांदी रंगीत असते. ही जात भुरी रोगास प्रतिकारक आहे.
४) को-१ : ही तामिळनाडू कृषि विद्यापीठाने विकसित केलेली जात कोंथिबीर आणि धन्यासाठी चांगळी आहे. या जातीचे ४० दिवसात हेक्टरी १० टन कोंथिबिरीचे उत्पादन मिळते.
५) जी-सी-२ :- जुनागड कृषि विद्यापीठ,गुजरात यांनी विकसीत केलेली जात कोथिंबीर चांगली आहे. या जातीचे ३५-४० दिवसात१०-१२ टन उत्पादन मिळते.

Exit mobile version