या तंत्रज्ञानाने करा हळद लागवड अन् कमवा लाखोंचा नफा

haladi-turmeric

सातारा : औषधी गुणधर्म असलेल्या हळदीचे उत्पादन महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे नगदी पिक असल्याने केवळ ८ ते ९ महिन्यात भरघोस उत्पादन देते. आज आपण हळद लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

हळद पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. तापमान २० ते २५ अंश सें.ग्रे. अनुकूल असून पाऊस ७० सें.मी. ते २५० सें.मी. पर्यंत चालतो. या पिकास मध्यम काळी, पाण्याचा उत्‍तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. नदीकाठी पोयट्याच्या जमिनीत हळदीचे पीक चांगले येते. काळ्या, चिकण माती व क्षारयुक्‍त चुनखडीच्या जमिनी हळदीच्या लागवडीस योग्य नाहीत. हळद लागवडीसाठी निवडलेली जमीन भुसभुशीत असावी.

हळदीची लागवड अक्षयतृतीयेपासून म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात करावी. हळदीच्या लागणीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते. मे ते जूनमध्ये लागवड केलेल्या हळदीचा कालावधी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत जातो.

हळदीची लागवड सरी वरंबा व रुंद वरंबा पद्धतीने केली जाते.
१) सरी वरंबा पद्धती: या पद्धतीने हळद लागवड करण्यासाठी ७५ सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूस दोन गड्ड्यामध्ये
३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी.
२) रुंद वरंबा पद्धत: या पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास १.५ मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात. म्हणजे दोन सर्‍यांमध्ये ९० सें.मी. ते
१ मीटरचा गादीवाफा तयार होतो. या गादीवाफ्यावर अगर रुंद वरंब्यावर दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर ३० सें.मी. ठेवून लागवड केली जाते. मात्र या पद्धतीत जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाफ्यांना सोडलेले पाणी व्यवस्थित देता येते
आणि उत्पादन चांगले येण्यास मदत होते. अन्यथा ठिबक संचाने पाणी व्यवस्थापन करावे लागते.

किडी व रोगांचे नियंत्रण
कंद माशी : कंदमाशीच्या नियंत्रणासाठी बेणे प्रक्रिया करावी. त्यासाठी क्‍विनॉलफॉस २० मि.ली. १४० लीटर पाण्यात टाकून बेणे १५ ते
२० मिनिटे बुडवावे. तसेच जमिनीमध्ये कार्बोफ्युरॉन प्रती हेक्टरी २० किलो याप्रमाणे तीन वेळा ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात कंदालगत
मातीत मिसळून दिले असता या किडीचा बंदोबस्त होतो.
रोग गड्डा कुजणे किंवा मुळकुजव्या: कंद कुजणे हा रोग बियाणे योग्य न वापरल्यामुळे आणि चांगला निचरा नसलेल्या जमिनीत लागवड केल्यास दिसून येतो. त्यासाठी योग्य निचर्‍याची जमीन निवडावी. जमिनीमध्ये थायरम २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून टाकावे.
पानावरील ठिपके व करपा: पानावरील ठिपके, करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी थंडीच्या कालावधीत डायथेन एम-४५ या औषधाची २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी दर १५ दिवसांच्या अंतराने करावी.

उन्नत वाण
१) कृष्णा : अधिक उत्पादन देणारा हा वाण असून हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे विकसित केलेला आहे. या वाणाच्या ओल्या हळदीचे हेक्टरी ४५० क्विंटल उत्पादन आणि वाळलेल्या हळदीचे ७५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते.
२) फुले स्वरुपा : ही जात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केली असून पिकाचा कालावधी १९० दिवसाचा आहे. फुलकिडे आणि लाल कोळी या किडीस तसेच भुरी व बोकड्या रोगास प्रतिकारक आहे. या वाणापासून २२५ ते २५० क्विंटल उत्पादन प्रती हेक्टरी
मिळते. या वाणाच्या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ५.१९ टक्के इतके असते.
३) सेलम : या वाणाचा पक्वतेचा कालावधी साडे आठ ते नऊ महिन्याचा असून हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के इतके असते. ओल्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते तर वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.
४) अलेप्पी : केरळमधील ही महत्त्वाची जात असून या हळदीच्या गाभ्याचालरंग पिवळा असतो. वाळलेल्या हळदीचे प्रमाण १९ ते २० टक्के मिळते. वाळलेल्या हळदीचे उत्पादन हेक्टरी ५० क्विंटल एवढे मिळते.
५) राजापुरी : प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात हा वाण प्रचलित असून कोकणात या वाणाच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. याच्या प्रत्येक झाडाला १० ते १८ पाने येतात. पाने रुंद, फिकट हिरवी आणि सपाट असतात. १५ ते २०
हळकुंड येतात. फुले क्वचित येतात. हळकुंडे जाड, आखूड, ठसठशीतलअसून गाभ्याचा रंग गर्द पिवळा आहे. उतारा १६ ते १८ टक्के
मिळतो. या वाणाच्या हळदीला गुजरात व राजस्थानमधून अधिक मागणी असून वाळलेल्या हळदीचे हेक्टरी ५६ क्विंटल उत्पादन मिळते.
६) वायगाव : विदर्भातील वर्धा, चंद्रपुर भागात प्रचलित हा वाण ८ ते १० महिन्यात तयार होतो. प्रत्येक झाडाला ८ ते १० पाने येतात. फुले
येण्याची प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत असून पाने गर्द हिरवी, चकाकणारी,लगाभ्याचा रंग गर्द पिवळा, उठावदार, विशिष्ट सुगंध असून वाळलेल्या
हळदीचे उत्पादन हेक्टरी ५० क्विंटल असून गाठी रताळ्यासारख्या जाड, गोल व लांबट असतात. याशिवाय टेकुरपेटा, प्रभा, प्रतिभा इत्यादी

Exit mobile version