रब्बी हंगामात अशी करा लसणाची लागवड, होईल मोठा आर्थिक फायदा

lasun garlic 1

पुणे : लसूण हे रब्बी हंगामात वाढणारे पीक आहे. सर्वसाधारण ऑक्टोबरच्या दुसर्‍या अथवा तिसर्‍या आठवड्यापासून लसूण लागवड सुरू करावी. लसणाच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य हवामानात व योग्य जमिनीत लसणाची लागवड करणे महत्त्वाचे आहे. लसूण लागवडीसाठी ज्याप्रमाणे हवामान चांगले असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जमिनीची निवड सुद्धा फार गरजेची असते. ज्या पिकांची जमिनीत वाढ होते.

लसूण लागवडीसाठी भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लसूण लागवडीसाठी जमीन मध्यम काळी, उत्तम निचर्‍याची, सेंद्रिय पदार्थ जमिनीत भरपूर असणारी असावी. हलक्या पोयट्याच्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करून, तसेच पाण्याच्या पाळ्या वाढवून चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. कमी निचर्‍याच्या भारी जमिनीत गड्ड्यांचा आकार बिघडतो. तसेच पिकाची काढणी करताना गड्डे तुटणे, खरचटणे असा त्रास होतो. हलक्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने गड्डे चांगले पोसत नाही.

आरोग्यास फायदेशिर
आहाराशास्त्रीयदृष्ट्या लसणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. रक्तातील कोलेस्टोरॉल ही एक वाढती समस्या आहे आणि त्यामुळे हृदयविकारात वाढ झालेली आहे. मात्र लसणाच्या नियमित सेवनाने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आधुनिक वैद्यक शास्त्रात लसणाचा उपयोग मधुमेह, कर्करोग इत्यादी विकारात चांगल्या प्रकारे होतो.

Exit mobile version