हृदय विकार, बीपीचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ नक्की खावे!

custard-apple-sitafal-for-heart-disorders

शेत शिवार । पुणे : थंडीच्या दिवसात सीताफळ बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. चवीष्ठ फळ म्हणून सीताफळ अनेकांना आवडते मात्र हे एक आरोग्यदायी फळ देखील आहे. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र ज्यांना मधूमेहाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच सीताफळ खावे.

असे आहेत सीताफळाचे फायदे

  1. सीताफळ खाल्ल्याने शरीरास नायट्रिक अ‍ॅसिड मिळते. जे शरीरातील बीपीवर नियंत्रण ठेवते. म्हणून, उच्च बीपी ग्रस्त लोकांनी सीताफळ घेणे आवश्यक आहे.
  2. हृदयाचे त्रास असणार्‍यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.
  3. सीताफळामध्ये व्हिटामिन बी-६चे प्रमाणात जास्त असते. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.
  4. सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.
  5. सीताफळ दात निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करते. सीताफळ खाल्ल्याने दातांमधील कमकुवत आणि पिवळे पणा कमी होतो व दात पांढरे आणि चमकदार बनतात.
Exit mobile version