रंगीत फुलकोबी आरोग्य आणि शेतकऱ्यांसाठी लाभदायक; जाणून घ्या कसे?

- Advertisement -

पुणे : शेतीत पीकांचे उत्पादन घेण्यासाठी आता नव नवे प्रयोग केले जावू लागले आहे. या प्रयोगांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही भर पडत आहे. असाच एक प्रयोग म्हणजे रंगीत फुलकोबीचा (Colored Cauliflower)! प्रामुख्याने ब्रिटन आणि फ्रान्समध्ये रंगीत कोबीचे उत्पादन घेतले जात असले तरी आता बिहारमध्ये रंगबेरंगी फुलकोबी घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील काही शेतकर्‍यांनीही रंगीत फुलकोबीचा यशस्वी प्रयोग करत मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई केली आहे. सध्या बाजारात मिळणार्‍या सामान्य फुलकोबीच्या दरापेक्षा याची किंमत अधिक असल्याने शेतकर्‍यांना अधिकचे उत्पन्नही मिळत आहे. शिवाय ही फुलकोबी आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्यासाठी लाभदायक

तज्ञांच्या मते रंगीत फुलकोबी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत असून कॅन्सरपासून बचावासाठी त्याचं सेवन केल जात आहे. रंगीत कोबीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यात व्हिटॅमिन ‘सी’ देखील भरपूर प्रमाणात असते. तसेच या कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम असल्याने त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो.

असे करा नियोजन

ज्या प्रकारे नियमित कोबीची लागवड केली जात त्याच प्रमाणे रंगीत कोबी लागवडीचे नियोजन करावे लागते. मात्र शेतकर्‍यांनी हा प्रयोग करतांना टप्प्याटप्प्याने याची लागवड करावी. सुरुवातीला कमी क्षेत्रफळावर लागवड करुन हळूहळू त्याचे प्रमाण वाढवत गेल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होवू शकतो. रंगीत कोबीचे बियाणे शेतकरी अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा