‘या’ आरोग्यवर्धक भाज्यांना मोठी मागणी

- Advertisement -

भंडारा : मार्च महिना सुरू झाल्यावरच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे भाज्यांच्या किंमती देखील वधारल्या आहेत. मात्र जिल्ह्यात आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्‍यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. ग्राहकांना या गावठी भाज्यांचा चांगला, आरोग्यवर्धक व स्वस्त पर्याय उपलब्ध आहे.

भंडारा जिल्ह्यातील चुलबंद खोऱ्यात पालांदूर हे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग घेत पालांदूर व परिसरात सर्वच प्रकारच्या भाज्यांचे मळे फुलले आहेत. कारले, लवकी, वांगे, टोमॅटो, भेंडी यासारख्या भाज्यांसोबत पालेभाज्यांत पालक, लाल चवळी, हिरवी चवळी, मेथी, राजगिरा, लाल भाजी, घोळ भाजी आदी पालेभाज्या अगदी ताज्या टवटवीत स्थानिक बाजारात व बागायतदारांकडे दिवसभर विक्रीला उपलब्ध आहेत. घरीच उत्पादित केलेले राजगिऱ्याचे बियाणे सांभाळून राजगिरा भाजीचे उत्पन्न घेतले जाते. पालांदूर येथे निवासी राहून बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले बरेच खवय्ये भाजीपाल्याच्या दृष्टीने पालांदूर कायमस्वरूपी आठवणीत ठेवतात.

१० ते १५ रुपये किलोने नेहमी विकणारा राजगिरा सर्वांनाच आवडीचा ठरत आहे. आदिवासींबरोबर काही शेतकरी देखील या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दूधी, गवार, ठाकरी मिरच्या, टॉमेटो, नवलकोल, शेपू, मेथी अशा बहुसंख्य गावठी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी 10, 15 व 20 रूपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. या वर्षी कोरोनाच्या संकटात देखील भाव स्थिर आहेत. फारसे रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या भाज्या आरोग्यवर्धक आहेत.

आदिवासींबरोबर काही शेतकरीही या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, अळूची पाने, गवार, डांगर, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सध्या 10 ते 20 रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्‍या भावात या भाज्या मिळतात. मागील वर्षीप्रमाणेच किमती स्थिर आहेत. कोणत्याही रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतावर व नैसर्गिकपणे तयार झालेल्या या भाज्यांना खूप मागणी असते

आदिवासी महिलांना रोजगार

अनेक आदिवासी वाड्या पाड्यांवरील आदिवासी आपल्या परसात आणि डोंगर उतार व रान माळावर विविध गावठी भाज्यांची लागवड करतात. परिणामी स्थानिक बाजारात आदिवासी व शेतकर्‍यांनी पिकविलेल्या भाज्यांना मागणी वाढली आहे. या भाज्यांना विकून स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांच्या हाती चार पैसे देखील मिळत आहेत.

हे देखील वाचा