शेतात काम करतांना ‘दामिनी ॲप’च्या मदतीने वीजांपासून असे करा संरक्षण

damini app

पुणे : मान्सूनचे राज्यभरात आगमन झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसापेक्षा वादळी वारे आणि वीजेचा कडकडाटच अधिक आहे. गत आठवड्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अश्या दुर्घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘दामिनी’ नावाचे एक मोबाईल ॲप (Damini Mobile App) तयार केले आहे जे वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अलर्ट देईल. हे ‘दामिनी ॲप’ गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप जीपीएस लोकेशनद्वारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे आपल्या ॲपमध्ये सभोवताली वीज पडणार असल्याच्या सुचना मिळतात. अशी सूचना मिळताच शेतकऱ्याला तर सुरक्षित ठिकाणी जाता येतेच शिवाय जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यापर्यंतचा वेळ त्याकडे राहतो. याबाबतची सर्व माहिती मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हे मोबाईल ॲप प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर काम करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे. यांनी तर ॲपचा वापर करायचाच आहे पण शेतकऱ्यांना याची माहिती देऊन वापर करण्याचा सल्ला द्यायचा आहे. त्यामुळे हे अत्याधुनिक ॲप शेतकऱ्यांसाठी अधिक उपयोगी ठरणार आहे.

Exit mobile version