वाढत्या तापमानामुळे पपईचे नुकसान, हा आहे तज्ञांचा सल्ला

papaya

पुणे : रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. यामधून पपई बागांचीही सुटका झाली नाही. अगोदर पावसामुळे रस शोषणार्‍या कीडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पाने गुंडाळली गेली तर पपई बागांची अपेक्षित वाढच झाली नाही. तर आता अंतिम टप्यात होत असलेल्या नुकसानीमुळे उत्पादनात घट होणार आहे.

अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. पानगळ झाल्याने सूर्य प्रकाश थेट फळावर पडत असल्याने त्याचा परिणाम पपई च्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत असल्याने ते काढून फेकल्या शिवाय दुसरा पर्याय शेतकर्‍यांकडे नाही. वर्षभर केवळ पदरी नुकसानच पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हे पपई बागा उद्ध्वस्त करीत असल्याचे चित्र आहे. उत्पन्न तर सोडाच पण वर्षभर केलेला खर्चही शेतकर्‍यांना मिळत नाही. याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

वाढत्या तापमानाचा परिणाम काय?
जिल्ह्यात वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ मुळे दुहेरी संकटात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. विषाणू जन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपई ची फळे पिवळे पडत आसल्याने शेतकर्‍याचा बागा उद्ध्वस्त होत आहेत.

संरक्षण हाच एकमेव पर्याय
वाढत्या ऊन्हामुळे पपईची पानगळ झाली आहे. त्यामुळे सूर्य प्रकाश थेट पपईंवर येत असल्याने पपई ही पिवळी पडली आहे. शिवाय अनेक ठिकाणी पपई पिकाचा खराबा झाला आहे. ज्या शेतकर्‍यांचा माल खराब झाला नाही त्यांनी पपईला आवरण घालणे महत्वाचे आहे. सध्या उन्हामध्ये तीव्र वाढ झाली असून अजून काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पपई बचावासाठी गोणपाटाचा वापर करुन फळ सुरक्षित ठेवणे हाच पर्याय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version