कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे बदलणार खरिपाचे चित्र, कापूस लागवडीला कशाचा अडसर?

drip-irrigation-for-cotton-farming

जळगाव : मॉन्सूनची चाहूल लागताच शेतकर्‍यांना खरीप पेरणीचे वेध लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे साडे चार लाख हेक्टर क्षेत्रफळावर कापसाचा पेरा होत असतो. बहुतांश शेतकरी मे महिन्याच्या अखेरीस कापसाची लागवड करण्यास प्राधान्य देतात. मात्र यंदा १ जून आधी कापसाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन न देण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होत आहे. परिणामी यंदा पूर्वहंगामी कापसाची लागवड देखील होणार नाही.

हंगामपूर्व कापसाची लागवड झाली की, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अळीची ही साखळी तोडण्यासाठी कृषी विभागाने १ जून नंतरच कापसाचे बियाणे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था असूनही शेतकर्‍यांना पूर्व मोसमी कापसाची लागवड करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांमध्ये नाराजी चे चित्र दिसून येत आहे.

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत १ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकर्‍यांना १ जून नंतर विक्री केले जाणार आहे.

Exit mobile version