खरिपाबाबत शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिला हा सल्ला…

ajit-pawar-ncp

मुंबई : यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा शुभसंकेतच आहे. गत दोन्ही हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतकर्‍यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकावीत तसेच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्नशील राहणारच आहे. मात्र, शेतकर्‍यांनीही कुठेही कमी न पडता उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्थेचे काम तब्बल १० वर्षापासून सुर आहे. १० वर्ष काम रेंगाळणे म्हणजे हा आमचा अपमान असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकार्‍यांची कान उघडणी केली. काम पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये सातत्य राहिले तरी दर्जाही टिकवता येतो. आता अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version