हरितगृहातील फुलशेतीवरील रोग व त्यांचे नियंत्रण; जाणून घ्या सविस्तर

shed-net-house

फोटो क्रेडिट : Green Pro

जळगाव : हरितगृहांचा वापर वाढत असून सध्यस्थितीला फुलशेतीसाठी याचा सर्वाधिक वापर होत आहे. आधुनिक फुलशेतीसाठी आरचर्ड हरितगृहे, व्हेनलो हरितगृहे व सॉ टुथ हरितगृहे ही हरितगृहे वापरली जातात. हरितगृहात तपमान, आर्द्रता, सुर्यप्रकाश, नियंत्रित केला जातो. त्यामुळे हरितगृहातील वातावरण पिकांच्या वाढीस पोषक असते. मात्र असे असले तरी हरितगृहातील पिकांची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. आज आपण हरितगृहातील फुलशेतीवर पडणारे रोग व त्यांचे नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गुलाब
काळे ठिपके : गुलाबावर काळे ठिपके पडतात. हा रोग पावसळयात मोठ्या प्रमाणावर येतो. थंड हवामान असेल तर मोठया प्रमाणावर प्रसार होतो. या रोगामुळे पानांच्या दोन्ही बाजुस ५ ते ६ मि.मि. व्यासाचे काळपट ठिपके पडतात त्यामुळे पांनाची गाळ होवुन झाड पुष्कळदा पानविरहित होते.
नियंत्रणाचे उपाय : १. झाडाखाली पडलेली रोगट पाने गोळा करुन जाळुन टाकावीत
२. कॅप्टन ०.२ टक्के ची ७-१२ दिवासांच्या अंतराने फवारणी करावी तर बाविस्टीन ०.१ टक्के बेनलेट ०.१ टक्के किंवा बेलेटॉन ०.१ टक्के ची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
भुरी : हा गुलाबावरील सर्वात महत्वाचा व त्रासदायक रोग आहे. उष्ण व कोरडी हवा या रोगास मानवते. एकदा का प्रादुर्भाव झाला की, मग संपुर्ण नियंत्रण अशक्य ठरते म्हणून रोग होऊच नये म्हणुन खबरदारी घ्यावी. या रोगाची सुरुवातीपासून लक्षणे म्हणजे कोवळया पानांवर, कळयावर, बुरशीचा पांढरट थर पसरतो. त्यामुळे कळया नीट उमलत नाहीत. उमल्या तरी त्यांचा आकार बदलतो व त्या आकुंचन पावतात.
नियंत्रणाचे उपाय : १. बाविस्टीन (०.१ टक्के) आणि बेलेटॉन (०.१ टक्के) सारखी आंतरप्रवाही बुरशीनाशके ३० दिवसाचा अंतराने फवारावीत.
२. सल्फर (०.२ टक्के) किंवा केराथेन (०.०५ टक्के) ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारल्यासही रोगाचे प्रभावी नियंत्रण होते.
मर : या रोगाचा प्रादुर्भाव छाटणी केलेल्या फाद्यातून होतो आणि झाड वरुन खालपर्यत वाळत जाते.
नियंत्रणचे उपाय : १. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
२. छाटणीकरिता धारदार कात्री वापरावी.
३. कात्री ७० टक्के अल्कोहोल किंवा फॉरमॅलीनने प्रत्येक छाटणीपूर्वी निर्जंतुक करावी.
तांबेरा : या रोगाची सुरुवात पावसाळयाच्या सुरुवातीस पानाच्या खाली लहान लहान फुगवटे येऊन होते. सुरुवातीस हे फुगवटे तांबूस नारंगी असतात व नंतर ते काळे पडतात. झाडांना हा रोग झाला तर झाडे पहिल्याच वर्षी मरतात.
नियंत्रणाचे उपाय : १. डायथेन-एम-४५ (०.२ टक्के), व्हिटाव्हॅक्स (०.१ टक्के) किंवा झयनेब (०.२ टक्के) ची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
फांद्या मर : तांबूस पांढरट पटटे पाकळया व कळयावर दिसतात. नंतर हे पटटे संपूर्ण फुलावर उमटतात.व फुलांची कुज सुरु होते.हा रोग वाहतुकीत फांद्यांना लागलेल्या मारामुळे सुध्दा होतो व फांद्या मरतात.
नियंत्रणाचे उपाय : १. बाविस्टीन ०.२ टक्के फवारणी करावी.

जरबेरा
स्केलेरोशियम रॉट : ताबुंस रंगाचे पटटे जमिनीलगतच्या खोडावर येतात. त्यानंतर झाड पिवळे पडते. मोहरीच्या आकाराच स्कलरोशिया कुजलेल्या खोडावर आढळतात.पाण्याचा योग्य निचरा होत नसलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्राणाचे उपाय : वॅपामचा वापर करुन जमिनीचे निर्जतुकीकरण करावे.
फुट रॉट : या रोगाचा प्रादुर्भावामुळे खोड काळे पडते व कुजते. पाने व फुले मरतात.
नियंत्रणाचे उपाय : वॅपामचा वापर करुन जमिनीचे निर्जतुकीकरण करावे
मर : फुलांच्या पाकळयावर काळे ठिपके आढळतात. खोलवर लागवड,पाण्यात निचरा न होणारी जमीन व कोदंट वातावरण यामुळे रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.
नियंत्राणाचे उपाय : कॅप्टन (०.७ टक्के) किंवा बेनलेट (०.१ टक्के) किंवा थायरम (०.१ टक्के) या द्रावणाची फवारणी करावी.
भुरी : या रोगामुळे धुरकट पांढ-या रंगाचे ठिपके झाडाच्या शेंडयावर व फुलदांडयावर येतात.
नियंत्रणाचे उपाय : पाण्यात मिसळणारे गंधक अथवा बेनलेट किंवा बाविस्टनची फवारणी करावी
पानांवरील ठिपके : वेगवेगळया आकाराचे व रंगाचे ठिपके पानांवर दिसतात.त्यांच्या प्रभावी नियत्रंणासाठी बोर्डो मिश्रण (०.१ टक्के) किंवा झायनेब (०.५ टक्के) किंवा झायरस (०.५ टक्के) या द्रावणाची फवारणी करावी.

कार्नेशन
फ्युज्यॅरीयम बिल्ट : या रोगामध्ये फांद्याची मर होते. फांद्या व शेंडयाकडील भाग तांबुस पिवळसर पडतात. प्रादुर्भाव झालेल्या झांडाच्या फांद्या खोडपासुन अलगद उपटुन येतात.
नियंत्रणाचे उपाय : १. हरितगृहात स्वच्छता राखवी. रोपे रोगांपासुन मुक्त असावीत. लागवडीपुर्वी जमिनीचे निर्जतुकीकरण करुन घ्यावे.
२. कॅप्टन या बुरशीनाशकाची ठराविक दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. तर बेनलेटचे द्रावण जमिनीत ओतण्यासाठी वापरावे.
फिलोफोरा बिल्ट : या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षण म्हणजे हिरवट तपकिरी पटटे शेडयांवरील भागावर दिसतात तर खोड रंगविहित होते. नंतर झाड मरुन जाते.
नियंत्रणाचे उपाय : १. हरितगृहात स्वच्छता राखावी लागवडीसाठी निरोगी रोपे वापरावीत झाडांना पाणी देताना विशेष काळजी घ्यावी.
२. प्रभावी नियंत्रणासाठी बेनोमिलचे द्रावण ठराविक दिवसांच्या अंतराने जमिनीत ओतावे.
खोडकुज : या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फांद्या व मुळे कुजतात.त्यामुळे प्रादुर्भाव झालेले झाड एका आठवडयत मरते.
नियंत्रणाचे उपाय : फयुजॅरीयम बिल्ट रोगाप्रमाणे नियंत्रण करावे.
पानावरील ठिपके व फांदीकुज : झाडयाच्या शेंडयावरील भागावर जांभळट रंगाचे ठिपके आढळतात. मग पानाच्या देठाजवळुन कुजणे सुरु होते तर छाट कलमांच्या जमिनीत असलेला भाग कुजतो.
नियंत्रणाचे उपाय : निरोगी झाडापासुन छाट कलम घ्यावीत. सात दिवसांच्या अंतराने (डायथेन-एम ४५ ०.१ टक्का) अथवा कॅप्टन(०.२ टक्का) ची फवारणी करावी.
तांबेरा : तांबुस रंगाचे पानांवर ,खोडावर तसेच फुलांच्या देठावरीलही दिसुन येतात प्रादुर्भाव झालेल्या झाडांची वाढ खुटंते व पाने चुरगळयासारखी होतात.
नियंत्रणाचे उपाय : १. हरितगृहातील वातावरण हवेशीर ठेवावे.
२. झायनेब या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

Exit mobile version