• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

कापसावर होणारे रोग, कीड व त्याचे व्यवस्थापन (भाग – १)

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in पीक लागवड
July 26, 2022 | 2:10 pm
bhag 1

प्रत्येक वर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे कापसावर (Cotton) विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे उत्पादनात कमतरता येवून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असते. एकअहवालानुसार, कपाशीवर भारतात १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्रात २५ प्रकारच्या कीड आढळून येतात. त्यांपैकी १० ते १२ कीडीच जास्त नुकसान करतात. कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकर्‍यांकडे असलेल्या शास्त्रशुध्द माहितीचा अभाव. पिकाच्या टप्प्यानुसार आणि किडीनुसार कीटकनाशकाची फवारणी आणि इतर पद्धतींचा अवलंब करून कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तेंव्हाच त्याचा योग्य परिणाम होतो. अन्यथा शेतकर्‍यांचे मोठे नुकासन देखील होवू शकते. यासाठी कापसावर होणारे विविध कीड रोग व त्यांचे व्यवस्थापन याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

१) मावा : थंड हवामान, पाऊस आणि अधिक आर्द्रता असे वातावरण असल्यास मावा या कीडचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो. कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रादुर्भाव सुरू होतो. सर्वांत जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आढळतो. थंड हवामान, पाऊस आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असले तरी जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते.
असे होते नुकसान : पिले व प्रौढ किडी पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यांवर समूहाने राहून त्यातील रस शोषतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय, मावा शरीरातून चिकट गोड द्रव बाहेर टाकतो. त्यामुळे पानाचा भाग चिकट बनतो. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानावर काळा थर जमा होतो. त्यामुळे पानांच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन त्यांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत.

२) तुडतुडे : अधूनमधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्‍त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो. सद्य परिस्थितीत बीटी कपाशीवर तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची तीव्रता खूप वाढली आहे. प्रौढ तुडतुडे साधारणपणे दोन ते चार मिलिमीटर लांब, पाचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखांवर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो आणि डोक्याच्या भागावर दोन काळे ठिपके असतात. मादी पानांच्या शिरेमध्ये अंडी घालते. वर्षभरात साधारणपणे ११ पिढ्या होतात.
असे होते नुकसान : प्रौढ तुडतुडे आणि पिले पानांच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषतात. अशी पाने कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पान लाल होऊन त्याच्या कडा मुरगळतात. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांना फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. सर्वांत जास्त प्रादुर्भाव ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळतो.

३) फुलकिडे : कोरडवाहू परिस्थितीत अधिक तापमान, कमी पाऊस किंवा पावसाची उघडीप असल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. फुलकिडे आकाराने लहान असून, त्यांची लांबी एक मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही थोडी कमी असते. रंगाने ते फिकट पिवळसर असतात. मादी कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूने त्यांच्या पेशीत अंडी घालते. एक पिढी १२ ते २१ दिवसांत पूर्ण होते.
असे होते नुकसान : प्रौढ फुलकिडे आणि पिले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात. झाडाची वाढ खुंटते. फुलकिडे पावसाळ्याच्या शेवटी आणि मोठी उघडीप पडली, तर मोठ्या संख्येने वाढतात आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उग्र रूप धारण करतात.

४) मिली बग (पिठ्या ढेकूण) : या किडीच्या अनेक प्रजाती आहेत. कपाशीवर आढळणार्‍या मिली बगच्या फेनोकोकस सोलेनोप्सीस या प्रजातीचे शरीर लांबट गोलाकार व रंग हिरवट काळा असतो. या किडीच्या शरीरावर चिकट, मेणचट आवरण असते व ते रंगाने पांढरट असते. मिली बगची एक मादी साधारणत: १५० ते ६०० अंडी देते. ती पुंजक्यामध्ये असतात व त्याभोवती कापसासारखे पांढरे आवरण असते.
असे होते नुकसान : मिली बगची पिले व प्रौढ या दोन्ही अवस्था कपाशीची पाने, कोवळे शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषतात. त्यामुळे हे भाग सुरुवातीला सुकतात व नंतर वाळून जातात. हे ढेकूण आपल्या शरीरातून मेणचट गोड रस स्रवतात. त्यावर बुरशी वाढून कपाशीची झाडे फिकट आणि काळपट पडतात. परिणामी, झाडांची वाढ खुंटते आणि झाडे वाळून जातात.

५) पांढरी माशी : सुरुवातीच्या काळातील रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी वापरामुळे बीटी कपाशीवर पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव आढळून येतो. प्रौढ माशी लहान असून साधारणपणे दोन ते तीन मिलिमीटर लांब असते. पांढर्‍या माशीची मादी पानांच्या खालच्या बाजूने एका ठिकाणी एक प्रमाणे अंडी घालते. पांढर्‍या माशीची पिले पानातील रस शोषण करून वाढतात आणि तेथेच कोषावस्थेत जातात.
असे होते नुकसान : पांढर्‍या माशीची पिले तसेच प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर, ठिसूळ होऊन शेवटी वाळतात. याशिवाय, पिले आपल्या शरीरातून गोड, चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी, पाने व झाड चिकट व काळसर होते आणि झाडाची वाढ खुंटते. (क्रमश:)

Tags: Cottonकापूस
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
pineapple

अननस शेती बद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर घ्या जाणून

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट