आंतरपीक घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

inter cropping

औरंगाबाद : एकाच जमिनीवर एकाच हंगामात मुख्य पिकाबरोबर एक किंवा दोन पिके विशिष्ठ रचनेद्वारे घेण्याच्या पद्धतीला आंतरपीक पद्धती म्हणतात. एकाच जमिनीवर एका हंगामात एकापेक्षा जास्त पिके घेता येतात. याचे अनेक फायदे आहेत. आंतरपिक घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, शेतकर्‍यांना कमी कालावधीत व एकाच जमिनीवर दोन पिकांचे उत्पादन घेता येते. लवकर तयार होणार्‍या आंतरपिकापासून मिळणारा पैसा शेतकर्‍यांना गरजेनुसार खर्च करता येतो. मात्र या शिवाय अन्य फायदेही असतात.

आंतरपीक पद्धतीचे फायदे
१) रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
२) मुख्य पिकासोबत आंतरपिकापासून अधिकचे उत्पादन मिळते.
३) आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते.
४) पसरत व बुटक्या आंतरपिकामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन जमिनीची धूप कमी होते.

Exit mobile version