फेसबूक, व्हॉट्सअप, पिझ्झा, बर्गरच्या दुनियेतील युवापिढीला शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कधी समजणार? 

कृषिप्रधान देशातील महाराष्ट्र हे एक कृषिप्रधान राज्य शेती आणि शेतकरी हे औद्योगिकरणाचे तसेच संपूर्ण मानवी जीवनाचे एक अविभाज्य घटक मानले जाता. जगाचा पोशिंदा मानला जाणारा अन्नदाता शेतकरी जर वर्षभर शेतात अहोरात्र राबूनही उपाशी राहत असेल. शेतकरी आत्महत्या थांबत नसेल तर निश्चितच हि बाब चिंताजनक आहे. आजच्या नव्या पिढीचा त्याचबरोबर गावखेड्यात , तांडावाड्यात देखिल आज शेतीकडे पाहण्याचा कल नकारात्मक होत आहे. अन्नधान्य सर्वांना हवे आहे. शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करतांना ‘ कॉटन ड्रेस ‘ हवायं म्हणून दुकानदाराला मोठ्या अदबीने सांगावेसे वाटते. पण शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करता येत नाही. 

आजच्या बहुतांश युवावर्गाला शहरात पानटपरी, हातठेला, पकोडा गाडी सारखे उद्योग करायला आनंदाने तयारी दाखवेल परंतु घरची शेती कसण्यास किंवा गावातील शेतात काम करण्यास कमीपणा वाटतो . हे ‘ अॅंटीॲग्री ‘ वातावरण असतांना शेतकऱ्यापुढे अनेक प्रश्न ठाण मांडून आहेत. मानसशास्त्रीय दृष्ट्या शेतकऱ्याचं मनोधैर्य पुर्णतः खचल्याचे दिसून येते. जनमानसात मिळणारी वागणूक शेतकरी कडे पाहण्याचा इतरांचा निगेटीव्ह कल त्यामुळे आपण एकटे असल्याची भावना अन्नदाता शेतकऱ्यामध्ये निर्माण होत आहे. इन्स्टाग्राम, फेसबूक, यू – टयूब, व्हॉट्सअप, पिझ्झा, बर्गरच्या दुनियेत वावरणाऱ्या युवापिढीला शेती आणि शेतकऱ्याचे प्रश्न याची अनुभूती देखिल फ्रेण्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे अशा नानातऱ्हेच्या दिवशी न चुकता गुलाब आणि चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करणाऱ्या डिजीटल पिढीला कृषिप्रधान राज्याचा पावनपर्व कृषिदिन कसा माहित असणार ? आपल्यासाठी वर्षभर राबणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याची कृतज्ञता कशी उमजणार ? शेती आणि शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा बहार करणारी उदारता पुढे यावी.

शेतकऱ्यांचे दुःख, वेदना समजून त्याला आपलेसे मानणारी भावना उदयास यावी. या हरित संवेदनामधून शेती आणि शेतकऱ्याविषयी निर्व्याज जिव्हाळा जपणारे विदर्भातील भुमीपुत्र, प्रसिद्ध साहित्यिक तथा अनेक मराठी चित्रपटाला गाणी देणारा गीतकार एकनाथराव पवार यांनी बळीराजा कृतज्ञतेची ‘ थेट शेतकऱ्याच्या बांधावर ‘ ही अभिनव संकल्पना देशात पहिल्यांदाच रुजवली. १ जुलै २०१९ राेजी  शेतकरी, शेतमजूराचा पावनपर्व असाणाऱ्या कृषिदिनाच्या औचित्याने देशात पहिल्यांदा ‘ थेट शेतकऱ्याच्या बांधावर ही बळीराजा कृतज्ञता व सक्षमीकरणाची मोहिम या मोहिमेचे प्रवर्तक एकनाथराव पवार यांच्या संकल्पनेतून गतवर्षी ‘ चांदा ते बांदा ‘ राबविण्यात आली. एरव्ही अवमानाने, नापिकीने हतबल झालेल्या, पेरणीच्या संघर्षाने होरपळून निघणाऱ्या बळीराजा शेतकऱ्याचा सन्मान समुपदेशन व सहाय्यता बघुन स्वतः बळीराजा बांधावर गहिवरल्याचे सुखद प्रसंग अनुभवायला मिळाले. मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ‘ हरितवसंत ‘ फुलवणारी ही कृषिप्रधान राज्याला व देशाला खुप काही सांगणारी अशी स्तुत्य संकल्पना होय.

भारतीय शेती आणि शेतकऱ्याच्या आस्थेचा प्रेरणादर्श व्यक्तीमत्व म्हणून जर कोणाकडे पाहिल्या जात असेल, ते ते म्हणजे शेतकऱ्याचे कैवारी आणि शेतकऱ्याच्या पायात काटा जरी रुतला तरी अश्रू ढाळणारा, शेतकऱ्याला जीवापाड जपणाऱ्या वसंतराव नाईक साहेबाचे नाव दृष्टीस येते. हरितक्रांतीचे, कृषिऔद्योगिक क्रांतीचे जनक वसंतराव नाईक म्हणायचे, ‘ शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर, लोकशाही मोडेल म्हणून शेती आणि शेतकरी टिकले पाहिजेत.’ आज याच ‘ कृषिवसंत ‘ विचाराने सर्वांनी कृषिधर्म जपण्याची नितांत गरज आहे. नाईक साहेबानी भारतीय शेती आणि कृषि औद्यागिकीकरणाला एक प्रेरक आयाम दिले. १९७२ सारख्या भिषण दुष्काळावर मात करून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम् बनवले.

शेती आणि शेतकऱ्याची जीवाभावाची नाती जोडून त्यांना सन्मानाचं जीवन दिलं. म्हणूनच तर १ ९ ६४ व १ ९ ७२ सारख्या भिषण दुष्काळातही शेतकरी जगला . देशापुढे एक आदर्श कृषिक्षेत्रात पुढे आला. महाराष्ट्राने देशाला अनेक प्रेरणादायी अभिनव प्रयोग , संकल्पना दिल्यात . हे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्यच मानावे लागेल . त्याचाच एक प्रत्यय म्हणजे ‘ आम्ही सारे थेट शेतकऱ्याच्या बांधावर ‘ या शेतकरी कृतज्ञतेच्या अभिनव संकल्पनेचा उल्लेख करावा लागेल. थेट शेत शिवारात बळीराजा शेतकऱ्याची कृतज्ञता व्यक्त करण्यापुरती ही संकल्पना मर्यादित नसून शेती व शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा मिळून देणारी आहे. त्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञान पिक व्यवस्थापन, समुपदेशन मनोबल विकास, मोफत फळझाड भेट आणि पाल्याना शैक्षणिक मदत ह्या बाबी यामध्ये अंतर्भुत आहेत.

आज प्रत्येक व्यवसायाला दजी व सन्मान आहे परंतु देश कृषिप्रधान असूनही शेती आणि शेतकऱ्याला दर्जा व सन्मान का नाही ? हे सत्य आजच्या तरुण शेतकऱ्यामध्ये पहायला मिळते. परंतु थेट शेतकऱ्याच्या बांधावर ही संकल्पना हरित प्रथा म्हणून रुढ झाल्यास शेतकऱ्याचे कैवारी वसंतराव नाईक साहेबाना कृषिदिनाची खरी आदरांजली ठरेल शिवाय शेती व शेतकऱ्यांना इतर व्यवसाय व व्यवसायिकाप्रमाणे दर्जा असल्याची आत्मभावना शेतकऱ्यामध्ये निर्माण होईल. वाढते औद्योगिकरण जागतिकीकरण व तंत्रज्ञानाच्या धुमश्चक्रीत आपण एकीकडे विकसीत जरी होत असलो, परंतु अन्नधान्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून शेतकरी जगणं अपरिहार्य आहे. शेतकऱ्याबद्दल मायेचा ओलावा निर्माण करुण त्यांना दिलासा देण्यात आणि कृतज्ञता व्यक्त करून आत्मबळ देण्यात ‘ थेट कऱ्याच्या बांधावर ‘ ही मोहिम अधिक उत्साहाने राबविण्याची आावश्यकता आहे.

– डॉ . प्रशांत राऊत,  वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था, नागपूर.

Exit mobile version