स्वादिष्ट व्यंजनासाठी लाखोळीच्या दाण्यांनाही भाव आला आहे. सुगिच्या दिवसात वाटाणा, तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. यात लाखोळीच्या शेंगा महाग असून निसलेल्या दाण्यांनासुद्धा चांगला भाव आला आहे. या शेंगाच्या दाण्यापासून चविष्ट खाद्यपदार्थ तयार केले जाते. द्विदल गवती वनस्पती लाखोळी ही द्विदल व गवती वनस्पती आहे. लाखोळी, लाखेड़ी किंवा लाख या नावांनी ते मराठी प्रसिद्ध आहे. या वनस्पतीला हिंदी भाषिक भी किया खेसारी नावाने ओळखतात. प्राचीन काळापासून जगातील अनेक देशामध्ये त्याची लागवड आणि वापर केला जात आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लेवाइरस सेटाइक्स असून इंग्रजी भाषेत यासपी या नावाने ओळखली जाते.
शांतीलाल कोठारी यांनी लाखोळी डाळीवरील बंदी हटविण्याठी मोठा लढा दिला होता. हिवाळ्यात चांगली मागणी असल्याने भावही वाढले आहेत. चक्क हंगामानंतर ३०० रू. प्रतिकिलो प्रमाणे दाणे विकले जाते. या शेंगाचे हिरवे दाणे शेंगा व दाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पूर्व विदर्भात लाखोळीचे पीक प्रसिद्ध आहे. हजारो वर्षांपासून आजही कित्येक श्रीमंत-गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या घरी थंडीच्या दिवसात लाखोळीच्या हिरव्या भाजीपासून भाजीभुरका तयार केला जातो. जेवणासाठी भाजी म्हणून वापरण्यात येणाऱ्या भाजीभुरक्याचा मोह परंपरेने आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळते.
शेतामध्ये हिरवीगार दिसणारी लाखोळी भाजी ग्रामीण महिला तोडून घरी आणतात. यानंतर तिला वाळवून त्यापासून भुरका तयार करतात. हा भाजीभुरका जेवणात वापरला जातो. यालाच पूर्व विदर्भात ‘कुकसाभाजी’ असेही म्हणतात. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसडगसोबतच देशातील धान उत्पादक प्रदेशात लाखोळी डाळीचे उत्पादन घेतले जाते. कुठलेही खत, पाणी व अत्यल्प लागवड खर्चात याचे उत्पादन घेणे शक्य आहे. धान कापणीला आल्यानंतर लाखोळीचे बियाणे शेतात फेकले जाते. काहीच दिवसात ते अंकुरते. पीक बहरते. सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांकडून या पिकाला पसंती दिली जाते. परंपरागत पीक म्हणून याची लागवड आजही केली जात आहे. बदलत्या परिस्थितीत हे पीक दुर्लक्षित राहिले.
हे देखील वाचा :