या दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना ड्रॅगन फ्रूटचा आधार

Dragon-Fruit

सांगली : परदेशी फळ म्हणून ओळखले जाणार्‍या ड्रॅगन फ्रूटची आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लागवड होवू लागली आहे. ड्रॅगन फ्रूटची देशासह परदेशातही ड्रॅगन फ्रूटची निर्यात केली जात आहे. परदेशात निर्यात केल्यामुळं शेतकर्‍यांना फायदा होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत आहेत. शेतकरी ऊस, द्राक्ष पिकांकडून ड्रॅगन फ्रूटची शेतीकडे जात आहेत. ऊसाच्या शेतीला बगल देऊन शेतकरी घेतायेत ड्रॅगन फ्रुटचं उत्पादन घेत आहेत.

दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातही आता ड्रॅगन फ्रुटची शेती फुलत आहे. शेतकरी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळले आहेत. सांगली जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं जात आहे. कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे.

ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी सुरुवातीला जास्त गुंतवणूक करावी लागते. मात्र, नंतर या पिकातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
ऊसाची शेती करणारे शेतकरी करतायेत ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. या पिकाच्या लागवडीमुळं शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत.

Exit mobile version