शेतीत होणार ड्रोनचा वापर; जाणून घ्या अर्थसंकल्पात काय झाली घोषणा

drone-in-farm-union-budget-2022

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बळीराजासाठी काही घोषणा केल्या आहेत. यात अत्याधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारामण यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही केला जाणार आहे.‘किसान ड्रोन’चा वापर केला जाईल. यामुळे पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदी, कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे. तसेच, शेतकर्‍यांना डिजिटल सेवा देणे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली.

देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Exit mobile version