Sagwan Farming : सागवानचे लाकूड किती महाग असते, याची कल्पना सर्वांना आहेच. सागवान शेतीचा खर्च आणि नफा: कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने सरकार शेतकर्यांना सागवान झाडांची लागवड करण्याचा सल्ला देते. त्याच्या लाकडाची गणना सर्वात मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये केली जाते. त्यापासून फर्निचर, प्लायवूड तयार केले जाते. याशिवाय सागवानाचा उपयोग औषधी बनवण्यासाठी केला जातो. अनेक शेतकरी सागवानची शेती करुन लाखों रुपये कमवत आहेत. हे झाड असे आहे, एकदा लावले की काही वर्षांनी त्याचे उत्पादन मिळते शिवाय या कालावधीत या झाडाच्या देखभालीसाठी खूप खर्चही येत नाही. मात्र लाखों रुपयांचे उत्पादन हमखास मिळते. आजा आपण सागवान शेतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मान्सूनपूर्व काळ सागवान पेरणीसाठी सर्वात अनुकूल मानला जातो. या ऋतूत रोप लावल्यास त्याची वाढ लवकर होते. सुरुवातीच्या काळात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पहिल्या वर्षी तीनदा, दुसर्या वर्षी दोनदा आणि तिसर्या वर्षी एकदा, साफसफाई करताना शेतातून तण पूर्णपणे काढून टाकावे लागते. झाडाच्या खोडाची नियमित छाटणी आणि पाणी दिल्यास झाडाची रुंदी झपाट्याने वाढते. या झाडाची पाने जनावरे खात नाही, तसेच झाडाची योग्य निगा राखली तर रोगराई होत नाही.
सागवान लागवडीसाठी गाळाची माती चांगली मानली जाते. किमान १५ अंश सेल्सिअस आणि कमाल ४० अंश सेल्सिअस तापमान त्याच्या लागवडीसाठी अनुकूल मानले जाते. सागवान रोपाची लागवड ८ ते १० फूट अंतरावर करावी. जर एखाद्या शेतकर्याकडे १ एकर शेत असेल तर तो त्यात सुमारे ५०० सागवान रोपे लावू शकतो. त्याच्या विकासासाठी सुमारे १० ते १२ वर्षे लागतात.
एका एकरातून एक कोटींची कमाई
एका शेतकर्याने सागवानाची ५०० झाडे लावली तर १२ वर्षांनी ती सुमारे एक कोटी रुपयांना विकली जाऊ शकतात. बाजारात १२ वर्षे जुन्या सागवानाच्या झाडाची किंमत २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत असून कालांतराने त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एक एकर शेतीतून १ कोटी रुपये आरामात मिळू शकतात. एकाच झाडापासून शेतकरी अनेक वर्षे नफा मिळवू शकतात. सागाचे झाड एकदा कापले की पुन्हा वाढते आणि पुन्हा कापता येते.