या मसाला पिकांचे उत्पादन घेवून कमवा मोठा नफा

masala

पुणे : आपल्याकडील चविष्ट आणि रुचकर जेवणाचं रहस्य म्हणजे, भारतीय मसाले. भारतातील मसाला पिकांच्या गुणधर्म व चवीमुळे पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. पूर्वी शेतकरी मसाला पिकांच्या लागवडीला फारसे प्राधान्य देत नव्हते मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकर्‍यांना मसाला पीकांच्या लागवडीचे महत्त्व कळाले आहे. आता देशाच्या बाजारपेठेसह अन्य देशांनाही भारतीय मसाले निर्यात केले जात आहेत. या मसाला पिकांमध्ये मिरची, हळद, लसूण, आले, धणे, जिरे, काळीमिरी, बडीशेप, दालचिनी, जायफळ, अजवायन, लवंग इ.चा समावेश होतो.

हळद : स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे हळद. दररोजच्या स्वयंपाकात, मसाल्यात, फोडणीत, तिखट, लोणची करण्यासाठी, तसेच धार्मिक कार्यात, कुंकू बनवण्यासाठी, सौंदर्य प्रसाधनात, सुती, औद्योगिक कारखान्यांत कपड्यांना रंगकाम करण्यासाठी व औषधी मलम व औषधे तयार करण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यांत हळदीचे पीक घेण्यात येते.
काळीमिरी : जेवणामध्ये विशिष्ट चव व सुगंध येण्यासाठी काळ्या मिरीचा वापर केला जातो. याशिवाय काळ्यामिरीमध्ये काही औषधी गुणधर्म देखील असल्याने काळ्या मिरीची मोठी मागणी असते.
लवंग : जेवणातील पदार्थांना चव देण्यासाठी आणखी एका पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तो म्हणजे लवंग! याशिवाय औषधी म्हणून देखील याचा वापर आयुर्वेदात केला जातो. विशेषत: दातदुखीवरील औषधे, पोटाच्या विकारांवरील औषधांचा यात समावेश होतो.

वेलची : वेलचीचा उपयोग खाण्यासाठी, तसेच आरोग्यासाठी उपयुक्त औषध तयार करण्यासाठी केला जातो. यासह मसाले भाज्या तयार करतांना किंवा मिठाईमध्ये देखील वेलचीचा वापर होतो.
जिरं : मसाला पिकांमध्ये जिर्‍यांच स्थान मोलाचे आहे. कारण भाज्यांना फोडणी देण्यासाठी जिर्‍याचा वापर करतात. जिर्‍यामध्ये २.५ ते ३.५ टक्के तेलाचा अंश असून जिरं आरोग्यासाठी चांगले आहे, कारण त्यामध्ये थायमॉलचे प्रमाण जास्त आहे.
बडीशेप : बडीशेप या मसाला पिकाचा मुख्यत्वे मुखसुगंधीसाठी उपयोग होतो. याशिवाय मसाले भाज्या करतांना बडीशेपचा वापर केला जात असल्याने बडीशेपला मोठी मागणी असते.
धणे : मसाले भाज्या तयार करतांना त्यास विशिष्ट चव येण्यासाठी धण्याची फोडणी दिली जाते. पित्तनाशक म्हणून देखील धणेपुडाचा वापर केला जातो.

Exit mobile version