कॅक्टस अर्थात निवडुंग शेतीतून होते लाखोंची कमाई; जाणून घ्या तंत्र

Earning lakhs from cactus farming

नागपूर : काही वनस्पती अशा असतात ज्या बांधावर उगतात आणि आपण त्यांना कापून किंवा उपटून फेकून देतो. मात्र प्रगतिशील शेतकरी त्याच वनस्पतींची शेती करुन लाखों रुपयांची कमाई करतात. अशीच एक वनस्पती म्हणजे, कॅक्टस अर्थात निवडुंग. आधुनिक शेती करणारे काही शेतकरी निवडुंगाच्या लागवडीतून अनेक पटींनी नफा कमावत आहेत. देश-विदेशात या वनस्पतीची मागणी सातत्याने वाढत आहे.

तेल, शॅम्पू, साबण आणि लोशन यांसारखी सौंदर्य उत्पादने निवडुंगापासून बनविली जातात, ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. निवडुंग लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही. काही भागांमध्ये विशिष्ट प्रकारची निवडुंग जणावरांना उन्हाळ्यात खाण्यासाठी दिली जातात. यामुळे भारतात अनेक भागांमध्ये निवडुंगाची व्यावसायिक शेती करण्याच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.

निवडुंगाची रोपटी ५ ते ६ महिन्यांत पूर्ण विकसित होते. पाहिले तर त्याची लागवड जून-जुलै ते नोव्हेंबर या काळात केली जाते. जर तुम्ही तुमच्या शेतात त्याची लागवड करायला सुरुवात केली तर त्यासाठी तुमच्या शेताची माती खारट असावी. रोप योग्य प्रकारे तयार झाल्यानंतर, जेव्हा त्याचे रोप १ मीटर उंच होईल आणि ५ ते ६ महिने पूर्ण झाले असतील तेव्हा शेतकर्‍यांनी त्याची कापणी करावी.

Exit mobile version