काय सांगता शेतकर्‍यांसाठी येतोय इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; जाणून घ्या सविस्तर

Electric tractor

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढणार्‍या दरांमुळे सर्वसामान्यांपासून ते शेतकरीही हैराण झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे उत्पादन दर देखील वाढत आहे. मात्र अनेकवेळा त्याचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. अशा संकट समयी शेतकर्‍यांसाठी एक गुडन्यूज आली आहे. ती म्हणजे शेतीत ट्रॅक्टरव्दारे केल्या जाणार्‍या कामांचा खर्च निम्म्याहून कमी होणार आहे. कारण भारतीय बाजारपेठेत लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर दाखल होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टी सामान्य जनता आणि सरकार यांच्यासाठी चिंतेचा विषय बनत आहेत. वाढती महागाई आणि वाढत्या प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा कल हळूहळू वाढत आहे. इतर देशांप्रमाणेच आता भारतातही अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक मोडवर स्विच करण्यात गुंतल्या आहेत. अशातच ओमेगा सेकी मोबिलिटी कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात १० हजारहून अधिक इलेक्टिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीचे चेअरमन उदय नारंग यांनी भारतात लाँच होणार्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बद्दल सर्वांना सांगितले आणि सांगितले की, ’कंपनीने दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये स्वतःची संशोधन-विकास केंद्रेही बनवली आहेत. येथे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या चाचणीचे काम सुरू आहे. कंपनीकडून ही चाचणी पूर्ण होताच हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच केले जाईल.

Exit mobile version