उन्हाळी कांदा लागवडीसाठी तज्ञांचा ‘हा’ आहे सल्ला

onion-kanda

नांदगाव : कांदा अनेक शेतकर्‍याचे नगदी पीक आहे. हे पीक तिन्ही हंगामात घेतले जात असले तरी रब्बी अर्थात उन्हाळी कांदा लागवड शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची असते. उन्हाळी कांदा लागवडीसाठी कांद्याचे बी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गादी वाफ्यावर टाकून रोपे तयार करतात व रोपांची लागवड डिसेंबर-जानेवारीत केली जाते. कांद्याची काढणी मार्चच्या चौथ्या आठवड्यापासून मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. या हंगामामध्ये हेक्टरी सरासरी २५० ते ३०० क्विटल कांद्याचे उत्पादन मिळते.

रब्बी अथवा उन्हाळी हंगामाकरीता प्रामुख्याने विटकरी रंगाचे व साठवणूकक्षम असलेले कांद्याचे वाण वापरले जातात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने एन -२ -४ -१ हा बाण उन्हाळी व रब्बी हंगामातील लागवडीकरीता विकसित केलेला आहे. तसेच ए.एफ.एल.आर व अरका निकेतन या वाणांचाही वापर
केला जातो. देशात तसेच महाराष्ट्रात या हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते व हंगामाची उत्पादन तसेच साठवण क्षमता उत्कृष्ट असते.

रब्बी अथवा उन्हाळी लागवडीसाठी कांद्याचे बी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात गादीवाफ्यावर टाकून रोपे तयार करतात व रोपांची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये केळी जाते. कांदा लागवडीसाठी एकसारखी रोपे वापरल्यामुळे एकसारख्या कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते व साठवणूकीसाठी तो योग्य असतो. तेव्हा रोपावाटिकेत रोपांची एकसारखी वाढ होण्याकरीता ३ : २ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा.

प्रत्येक गादीवाफ्यात साधारणपणे दोन घमेले शेणखत, २५० ग्रॅम सुफला (१५:१५:१५) व २० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड (ब्लायटॉक्स) ची पावडर मिसळावी. प्रत्येक वाफ्यात १० सें.मी. अंतराच्या ओळीमध्ये बियाणे पातळ पेरावे. बियाणे उगवल्यानंतर १५ दिवसांनी दोन ओळींमध्ये हलकीशी खुरपणी करुन प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया व ५ ग्रॅम थिमेट द्यावे. एक महिन्यानंतर १० लीटर पाण्यात १० मि.ली. मेटासिस्टॉक २५ ग्रॅम डायथेन एम-४५ १०मि. ली. चिकट द्रव्य मिसळून एक फवारणी द्यावी.

Exit mobile version